नवी दिल्ली: सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून डॉली पार्टन चॅलेंजची क्रेझ सुरू आहे. अनेक सेलिब्रिटीपासून ते सामान्य युझर्स #DollyPartonChallenge खेळत आहेत. यात आता भारताचा वेगवान गोलंदाज देखील त्याचे चार फोटो कोलाज करून इस्टाग्रामवर शेअर केले आहे. इशांतने इस्टाग्रामवर त्याच्या चार फोटोचा कोलाज केला आहे. या चार फोटोवर अनुक्रम फेसबुक, लिंक्डइन, इस्टाग्राम आणि टिंडर असे लिहले आहे. हा फोटो शेअर करताना तो म्हणतो, माझ्या वैवाहिक आयुष्यात आनंदी आहे. माजी पत्नी प्रतिमाला जर कळाले की मी टिंडरवर आहे. तर ती माझा जीव घेईल. इशांत शर्माने ९ डिसेंबर २०१६ रोजी प्रतिमा सिंगशी विवाह केला होता. प्रतिमा एक बास्केटबॉल खेळाडू आहे. वाचा- अमेरिकेतील गायक डॉली पार्टनच्या नावावर सोशल मीडियावर ही क्रेझ सुरू झाली. पार्टनने २२ जानेवारी रोजी स्वत:चा फोटो कोलाज करून इस्टाग्रामवर शेअर केला होता. वाचा- काय आहे डॉली पार्टन चॅलेंज सोशल मीडियावर सुरू असलेल्या डॉली पार्टन चॅलेंजमध्ये प्रत्येक जण स्वत:चे वेगवेगळे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करतो. या चॅलेंजमध्ये संबंधित व्यक्तीला फेसबुक, लिंक्डइन, इस्टाग्राम आणि टिंडर या सोशल मीडियावरील सर्वोत्तम फोटो कोणता आहे हे सांगावे लागते. जगभरातील अनेक स्टार, क्रिकेटपटू आणि युझर्स अशा पद्धतीने फोटो शेअर करत आहेत. हे देखील वाचा-
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/37vjAeV
No comments:
Post a Comment