केपटाऊन: दक्षिण आफ्रिकेत सुरू असलेल्या आयसीसी १९ वर्षाखालील वर्ल्ड स्पर्धेत भारतीय संघाने उपांत्य पूर्व फेरीत प्रवेश केला आहे. मंगळवारी उपांत्य पूर्व फेरीत भारताचा मुकाबला ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार आहे. सध्या शानदार फॉर्ममध्ये असलेल्या आणि गतविजेत्या भारतीय संघाला या स्पर्धेचे चौथे विजेतेपद जिंकण्याची संधी आहे. याआधी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात गेल्या स्पर्धेत अंतिम सामन्यात भिडले होते. तेव्हा पृथ्वी शॉच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाचा पराभव करत विजेतेपद मिळवले होते. भारत आणि ऑस्ट्रेलिया या संघातील लढती नेहमीच चुरशीच्या होतात. १९ वर्षाखालील वर्ल्ड कपमध्ये यंदा या दोन्ही संघापैकी एक संघ अंतिम फेरीत दाखल होईल. भारतीय संघाने ग्रुप ए मध्ये अव्वल स्थान मिळवत उपांत्य पूर्व फेरीत प्रवेश केला. ऑस्ट्रेलिया त्यांच्या ग्रुपमध्ये दुसऱ्या स्थानावर राहिला. वाचा- असा झाला भारतीय संघात प्रवासग्रुप ए मध्ये भारताने श्रीलंका, न्यूझीलंड आणि जपान या संघांचा पराभव केला. भारताने श्रीलंकेला ९० धावांनी नंतर जपानचा १० विकेटनी तर न्यूझीलंडविरुद्धचा सामना पावसामुळे डकवर्थ लुइस नियमानुसार ४४ धावांनी जिंकला. या तिन्ही सामन्यात भारतीय फलंदाजांनी आणि गोलंदाजांनी शानदार कामगिरी केली. हे देखील वाचा- असा झाला ऑस्ट्रेलियाचा प्रवास स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात ऑस्ट्रेलियाचा वेस्ट इंडिजकडून ३ विकेटनी पराभव झाला. १९ वर्षाखालील वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासात वेस्ट इंडिजविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा हा पहिलाच पराभव ठरला. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने नायझेरियाचा १० विकेटनी तर इंग्लंडचा चुरशीच्या लढतीत २ विकेटनी पराभव केला. इंग्लंडचा पराभव करत ऑस्ट्रेलियाने उपांत्य पूर्व फेरीत प्रवेश केला. वाचा- भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांची १९ वर्षाखालील वर्ल्ड कपमधील कामगिरी शानदार आहे. भारताने सर्वाधिक ४ वेळा या स्पर्धेचे विजेतेपद मिळवले आहे. तर ऑस्ट्रेलियाने ३ वेळा जेतेपद मिळवले आहे. भारताने २०००, २००८, २०१२ आणि २०१८ साली तर ऑस्ट्रेलियाने १९८८, २००२ आणि २०१० मध्ये विजेतेपद मिळवले होते.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2RRjurE
No comments:
Post a Comment