इंदूर: मध्य प्रदेशचा क्रिकेटपटू याने शानदार गोलंदाजीकरत इतिहास रचला. सोमवारी प्रथम श्रेणी सामन्यात पदार्पणाच्या रवीने पहिल्याच षटकात हॅटट्रिक घेतली. प्रथम श्रेणीच्या पहिल्या सामन्यात हॅटट्रिक घेणारा रवी पहिला गोलंदाज ठरला आहे. रणजी स्पर्धेतील मध्य प्रदेश विरुद्ध उत्तर प्रदेश यांच्यातील सामन्यात रवीने अनोखा पराक्रम केला. इंदूर येथे २८ वर्षीय रवीने स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात विक्रमी कामगिरी केली. वाचा- उत्तर प्रदेशविरुद्ध त्याने आर्यन जुयाल, अंकित राजपूत आणि समीर रिजवी यांना बाद करत हॅटट्रिक पूर्ण केली. भारतीय नियामक बोर्डाने सोशल मीडियावर या हॅटट्रिकचा व्हिडिओ शेअर केला आहे. वाचा- रवीने आर्यनला कॅच बाद केले. त्यानंतर अंकित आणि समीर यांना बोल्ड केले. या सामन्यात रवी यादवने ६१ धावा देत पाच विकेट घेतल्या. त्याच्या या शानदार कामगिरीमुळे मध्य प्रदेशने पहिल्या डावात १४ धावांची आघाडी घेतली. हे देखील वाचा-
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2O7usIq
No comments:
Post a Comment