वृत्तसंस्था, हॅमिल्टन फॉर्मात असलेल्या भारतीय संघाला न्यूझीलंडमध्ये प्रथमच टी-२० मालिका जिंकण्याची संधी आहे. आज, बुधवारी भारत-न्यूझीलंड टी-२० मालिकेतील तिसरी लढत हॅमिल्टनला होणार आहे. भारताने पाच टी-२०च्या मालिकेतील पहिली ऑकलंड लढत सहा विकेटने तर दुसरी लढत सात विकेटने जिंकून मालिकेत २-० अशी आघाडी घेतली आहे. सेडन पार्कमधील तिसरी टी-२० जिंकून भारत मालिकेत विजयी आघाडी घेईलच; पण राखीव खेळाडूंना पुढील फेरीत आजमावण्याची मोकळीकही विराटला मिळेल. याआधी २००८-०९मध्ये महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने टी-२० मालिकेत न्यूझीलंडमध्ये ०-२ असा मार खाल्ला होता. तर गेल्याच वर्षी भारताला न्यूझीलंडमधील टी-२० मालिकेत यजमानांकडून ०-२ असा पराभव पत्करावा लागला होता. एकूणच कामगिरीचा हिशेब करायचा झाला तर विराट कोहलीच्या या भारतीय टी-२० संघाने गेल्यावर्षीच्या वनडे वर्ल्डकपनंतर पाच टी-२० मालिकांमध्ये अपराजित राहण्याचा सिलसिला कायम राखला आहे. एकूणच भारतीय संघ फॉर्मात आहे. वाच- फक्त द. आफ्रिकेत पार पडलेल्या टी-२० मालिकेत भारताला १-१ अशा बरोबरीत समाधान मानावे लागले होते; कारण एक लढत पावसामुळे वाया गेली होती. तेव्हा आपला झंझावात कायम राखत किवींच्या देशात तिरंगा फडकावण्याची संधी भारताला आहे. मात्र सध्याच्या झंझावाताचा भारताच्या टी-२० रँकिंगवर परिणाम होणार नाही. सध्या आयसीसी टी-२० रँकिंगमधील संघांच्या क्रमवारीत भारत पाचवा आहे. भारताने ही मालिका ५-० अशी जिंकली तर भारतीय संघ चौथ्या क्रमांकावर झेप घेईल. न्यूझीलंड संघ सध्या सहाव्या क्रमांकावर आहे. वाचा- भारतीय संघाला सध्या वेध लागले आहेत ते टी-२० वर्ल्डकपसाठी संघाची बांधणी करण्याचे. श्रेयस अय्यर, मनीष पांडे हे दोघे चांगली कामगिरी करत असल्याने सध्या संघव्यवस्थापनाचा जीव भांड्यात पडला आहे. दोन टी-२०मध्ये विजयी ठरलेला भारतीय संघच कर्णधार कायम ठेवेल. मंगळवारी भारतीय संघाचा पर्यायी सराव होता. त्यामुळे विराट कोहली, लोकेश राहुल, युझवेंद्र चहल, मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह या संघातील महत्त्वाच्या खेळाडूंनी मैदानापासून दूर राहणेच पसंत केले. संघाच्या सपोर्ट स्टाफने राखीव खेळाडूंकडून मेहनत करून घेतली. रवी शास्त्री यांनी वॉशिंग्टन सुंदरसाठी विशेष वेळ काढला. तर फलंदाजीचे प्रशिक्षक विक्रम राठोड ऋषभ पंतला मार्गदर्शन करण्यात व्यग्र होते. हे देघो बुधवारीही राखीव खेळाडू म्हणूनच बसतील हे जवळपास निश्चित आहे. वाचा- >> सेडन पार्कवर पार पडलेल्या गेल्या चार टी-२०मध्ये प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने बाजी मारली आहे. ‘भारतीय संघ प्रतिस्पर्ध्यांच्या मैदानावरील कामगिरी सामन्यागणिक उंचावत आहे. या संघात जागतिक दर्जाचे खेळाडू आहे. पहिली लढत आमच्या हातून थोडक्यात निसटली; पण दुसऱ्या लढतीत त्यांनी आम्हाला पुरतेच झोपवले. बुधवारी त्यांच्यावर सरशी साधायची असेल, तर आम्हाला सर्वोत्तम खेळ करावा लागेल’- टिम साऊदी (न्यूझीलंडचा तेज गोलंदाज) ‘ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये रंगणाऱ्या टी-२० वर्ल्डकपसाठी आम्ही प्राथमिक संघ जवळपास निश्चित केला आहे. मात्र विविध गोष्टींवर अगदी शेवटच्या क्षणापर्यंत काम सुरू राहील. मात्र जे खेळाडू टी-२० वर्ल्डकपसाठी असतील, ते आम्हाला गवसले आहेत. आता एखादी सुमार कामगिरी किंवा दुखापतच आम्ही हेरलेल्या खेळाडूंमध्ये बदल घडवू शकेल...’- विक्रम राठोड, भारताचे फलंदाजीचे प्रशिक्षक
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/318DjyP
No comments:
Post a Comment