नवी दिल्ली: फलंदाजी किंवा गोलंदाजी नव्हे तर अनेक वेळा क्षेत्ररक्षणामुळे सामन्यात विजय मिळवता येतो. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये स्वत:च्या क्षेत्ररक्षणामुळे सामना जिंकून देणारा पहिला खेळाडू म्हणून दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू याचे नाव घ्यावे लागले. जॉटीने क्रिकेटमधील फिल्डिंगची व्याख्याच बदलून टाकली. चेंडूवर मजबूत पकड आणि थेट विकेटवर थ्रो यामुळे जॉटीने अनेक सामन्यांचा निकाल बदलला. जॉटीने क्रिकेटमधून निवृत्ती घेऊन बराच काळ लोटला आहे. तो सध्या अनेक संघांना फिल्डिंगचे धडे देतोय. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये १९९२ साली झालेल्या वर्ल्ड कप स्पर्धेत जॉटीने हवेत उडी घेत पाकिस्तानच्या इंझमाम उल हक याला बाद केले होते. जॉटीच्या त्या कॅचची चर्चा झाली होती. क्रिकेटमधील या महान खेळाडूने क्रिकेटमधील सर्वात आवडता खेळाडू कोण या प्रश्नावर एका भारतीय खेळाडूचे नाव घेतले आहे. अर्थात तुम्हाला वाटेल हे नाव भारताचा कर्णधार विराट कोहली, हिटमॅन रोहित शर्मा, महेंद्र सिंग धोनी किंवा शिखर धवन यापैकी कोणाचे असेल. पण प्रत्यक्षात तसे नाही. जॉटीने आवडता खेळाडू म्हणून ज्याचे नाव घेतले आहे ते ऐकून अनेकांना धक्का बसला. वाचा- चाहत्यांसोबत चर्चा करताना जॉटीला सर्वात आवडता खेळाडू कोण असा प्रश्न विचारण्यात आला. त्याला उत्तर देताना जॉटीने याचे नाव घेतले. सर्फराजने काही दिवसांपूर्वी रणजी सामन्यात त्रिशतक झळकावले होते. (वाचा संबंधित बातमी- ) आता जॉटीने त्याचे नाव घेतल्यामुळे सर्फराज पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. वाचा- जगातील सर्वोत्तम फिल्डर म्हणून जॉटीने दक्षिण आफ्रिकेचा हर्शल गिब्स, एबी डिव्हिलियर्स, ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टिंग, न्यूझीलंडचा मार्टिन गप्टिल, भारताचा सुरेश रैना आणि रवींद्र जडेजा यांचा उल्लेख केला. क्रिकेटच्या बाहेर अन्य खेळातील सर्वात आवडता खेळाडू कोण या प्रश्नावर जॉटीने महान फूटबॉलपटू पेले यांचे नाव घेतले. जॉन्टी आयपीएल २०२०मध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबचा फिल्डिंग कोच आहे. हे देखील वाचा-
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2RRaSBp
No comments:
Post a Comment