
नवी दिल्ली: एखाद्या गोलंदाजाने फलंदाजाला बाद केल्यानंतर त्याचा उत्साह मैदानावर पाहण्यासारखा असतो. आजकाल प्रत्येक गोलंदाज विकेट सेलिब्रेशनसाठी एक खास प्रकारचे ट्रेडमार्क बनवतानाही दिसतो. परंतु दक्षिण आफ्रिकेचा चायनामॅन या शर्यतीत वेगळाच पराक्रम करताना दिसला. शम्सीने बळी घेतल्यानंतर आपल्या चाहत्यांना मैदानात जादू दाखवत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. बुधवारी, त्याने मैदानावर एका विकेट सेलिब्रेशन दरम्यान रुमालाची काठी बनवून सर्वांना चकित केले. दक्षिण आफ्रिकेत सध्या टी-२० लीग '' सुरू आहे. शम्सीने फलंदाज विहाब लुबेला आपल्या चेंडूवर बाद केल्यानंतर त्याने ही कमाल करून दाखवली. लुबेला बाद केल्यानंतर शम्सीने आपल्या खिशातून लाल रंगाचा रुमाल काढला आणि पाहता पाहता त्याने रुमालाची छडी बनवली. ही किमया पाहून त्याचे चाहते चकीत झाले. मंझासी सुपर लीगने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर शम्सीचा हा जादूचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. 'विकेट, शम्सीकडून थोडीसी जादू' असे कॅप्शनही या व्हिडिओसाठी देण्यात आले आहे. तबरेज शम्सीने आपल्या जादूची ही प्रतिभा पार्ल रॉक्स आणि डरबन हीट या संघांदरम्यान खेळल्या गेलेल्या सामन्यादरम्यान दाखवली. या टी-२० लीगमध्ये शम्सी पार्ल रॉक्सकडून खेळत आहे. तथापि, शम्सीची ही जादू संघाला विजय मिळवून देऊ शकली नाही. पार्ल रॉक्सने दिलेले १९७ धावांचे लक्ष्य डरबन हीटने ७ चेंडू राखून पार केले.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/365SgTK
No comments:
Post a Comment