Ads

Wednesday, January 8, 2020

विराट @ १...कसोटीत कोण-कोण घसरलं?

दुबई: आयसीसी कसोटी क्रमवारीत फलंदाजांच्या यादीत भारताचा कर्णधार अव्वल स्थानी कायम आहे. तर कसोटीपटू आणि यांच्या स्थानात घसरण झाली आहे. कोहलीचे ९२८ गुण आहेत. तर दुसऱ्या स्थानी असलेला ऑस्ट्रेलियाचा फलंदाज स्टीव्ह स्मिथ याचे ९११ गुण आहेत. पुजाराची एका स्थानानं घसरण झाली आहे. त्याचे ७९१ गुण असून, तो सहाव्या क्रमांकावर आहे. तर रहाणेची दोन स्थानांनी घसरण झाली असून ७५९ गुणांसह तो नवव्या स्थानी आहे. आयसीसीनं बुधवारी ताजी कसोटी क्रमवारी जाहीर केली. यात फलंदाजांच्या क्रमवारीत भारतीय कर्णधार विराट कोहलीचं अव्वल स्थान कायम आहे. तर ऑस्ट्रेलियाचा फलंदाज स्टीव्ह स्मिथ हा दुसऱ्या स्थानी आहे. भारताचा फलंदाज चेतेश्वर पुजारा याची एका स्थानानं घसरण झाली आहे. तर रहाणेची दोन स्थानांनी घसरण झाली आहे. पुजारा हा सहाव्या स्थानी असून, रहाणे नवव्या स्थानी आहे. गोलंदाजांच्या क्रमवारीत भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह ७९४ गुणांसह सहाव्या स्थानी कायम आहे. तर फिरकीपटू रविचंद्रन अश्विन हा ७७२ गुणांसह नवव्या आणि मोहम्मद शामी हा ७७१ गुणांसह दहाव्या स्थानी आहे. ऑस्ट्रेलियाच्या मार्नस लाबुशाने यानं क्रमवारीत तिसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. २५ वर्षीय मार्नसनं न्यूझीलंडविरुद्ध अखेरच्या कसोटी सामन्यात २१५ आणि ५९ धावांची खेळी केली होती. अलीकडेच झालेल्या या मालिकेत त्यानं सर्वाधिक ५४९ धावा केल्या होत्या. गोलंदाजांमध्ये कमिन्स अव्वल ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स ९०४ गुणांसह अव्वल स्थानी आहे. तर नील वॅगनर हा ८५२ गुणांसह दुसऱ्या, तर वेस्ट इंडीजचा जेसन होल्डर हा ८३० गुणांसह तिसऱ्या स्थानी आहे. मिशेल स्टार्क पाचव्या स्थानी आहे. फिरकीपटू नॅथन लायन १४ व्या स्थानी आहे.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2QVuFz4

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...