Ads

Sunday, January 5, 2020

व्वा...यासाठी शेन वॉर्न करणार टेस्ट कॅपचा लिलाव

सिडनी: क्रिकेटमधील आपल्या कामगिरीमुळे आणि मैदानाबाहेरील कारनाम्यांमुळे अनेकदा चर्चेत राहिला आहे. आता, शेन वॉर्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. शेन वॉर्न आपली ग्रीन टेस्ट कॅपचा लिलाव करणार आहे. ऑस्ट्रेलियातील जंगलाला लागलेल्या भीषण आगीतील पीडितांच्या मदतीसाठी त्याने हे पाऊल उचलले आहे. ऑस्ट्रेलियातील जंगलात मागील काही दिवसांपासून भीषण आग लागली आहे. या आगीत हजारो प्राण्यांना जीव गमवावा लागला आहे. हजारो प्राणी जखमी झाले आहेत. तर, अनेक नागरिकांना स्थलांतर करावे लागले आहे. त्यांच्या मदत निधीसाठी शेन वॉर्न आपल्या ग्रीन टेस्ट कॅपचा लिलाव करणार आहे. शेन वॉर्नने ट्विटरवर याची माहिती दिली आहे. एका ऑनलाइन वेबसाइटवर या ऐतिहासिक टेस्ट कॅपचा लिलाव करण्यात येत आहे. वॉर्नने सिडनी क्रिकेट ग्राउंडवर आपल्या बॅगी ग्रीन टेस्ट कॅपसह फोटो काढला आहे. हा फोटो ट्विट करत त्याने लोकांना आवाहनही केले आहे. ऑस्ट्रेलियातील जंगलांना लागलेल्या आगीमुळे अनेकांचे प्राण गेलेत, अनेक घरं उद्धवस्त झाली आहेत. अनेक प्राण्यांचे जीव गेले आहेत. या वाईट परस्थितीत आपण एकत्र असून पीडितांना मदत करणार असल्याचे वॉर्न याने आवाहनात नमूद केले आहे. माझ्या ग्रीन टेस्ट कॅपच्या लिलावातून काही निधी उभा राहिल. पीडितांच्या मदतीसाठी हा निधी उपयोगी येईल असे म्हणत वॉर्नने लिलावासाठी बोली लावण्याचे आवाहन केले आहे. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेण्याच्या यादीत शेन वॉर्न दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने १४५ कसोटीत ७०८ कसोटी विकेट घेतले आहेत. पहिल्या क्रमांकावर ८०० कसोटी विकेट्स आहेत. शुक्रवार १० जानेवारीपर्यंत ऑनलाइन बोली लावण्यात येईल.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/37FNWeG

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...