लाहोरः भारतीय संघ टी-२० स्पर्धा खेळायला यायला तयार नसेल. तर पाकिस्तानदेखील २०२१ मधील टी-२० विश्वचषक स्पर्धा खेळायला भारतात जाणार नाही, अशी दर्पोक्ती पाकिस्तान क्रिकेट मंडळाने () केली आहे. टी-२० आशिया चषक स्पर्धेच्या आयोजनातून पाकिस्तानने काढता पाय घेतला आहे, या वृत्ताचे पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे कार्यकारी अधिकारी यांनी खंडन केले आहे. आताच्याघडीला आम्ही आशिया चषकासाठी दोन पर्यायांचा विचार करत आहोत. भारताने या ठिकाणी येण्यास नकार दिला, तर पाकिस्तानही २०२१ मध्ये भारतात होणाऱ्या टी-२० विश्वचषकात सहभागी होणार नाही, असा इशारा पीसीबीने दिला आहे. आशिया करंडक स्पर्धेच्या आयोजनातील बदल आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद किंवा पीसीबी यांच्या विशेषाधिकारात येत नाही. आयोजनाचे ठिकाण आणि त्या संदर्भातील निर्णय केवळ आशिया क्रिकेट परिषद घेऊ शकते, असा दावा वसीम खान यांनी केला आहे. आशिया करंडक स्पर्धा पाकिस्तानात आयोजित होणार होती. मात्र, त्याच्या आयोजनाचे अधिकार पीसीबीने बांगलादेश क्रिकेट मंडळाला दिले आहेत, असे वृत्त आले होते. ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या टी-२० विश्वचषक २०२० या स्पर्धेच्या महिनाभर आधी आशिया करंडक २०२० खेळला जाणार आहे. या स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तानकडे होते. मात्र, पाकिस्तानकडून या स्पर्धेचे यजमानपद काढून घेण्यात आल्याचे वृत्त आहे. या स्पर्धेसाठी आता बांगलादेश, श्रीलंका किंवा दुबई या पर्यायांचा विचार केला जात आहे. भारत आणि पाकिस्तान या दोन देशातील राजकीय तणावामुळे सन २००८ पासून भारतीय संघ पाकिस्तानच्या दौऱ्यावर गेलेला नाही. तर केवळ २०१२ मध्ये पाकिस्तान संघ भारताच्या दौऱ्यावर आला होता.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2RQwYDU
No comments:
Post a Comment