नवी दिल्लीः भारताचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक महेंद्र सिंह धोनीनंतर भारतीय संघ दमदार यष्टीरक्षकाच्या शोधात आहे. युवा खेळाडू ऋषभ पंतच्या खांद्यावर यष्टीरक्षणाची जबाबदारी दिली. मात्र, पंतची फलंदाजी आणि यष्टींमागची खराब कामगिरी हा गेल्या काही दिवसांपासून चर्चेचा मुद्दा बनलेला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेपासून भारतीय संघाने लोकेश राहुलला यष्टीरक्षणाची संधी दिली. राहुलला दिलेली जबाबदारी त्याने योग्य पद्धतीने पार पाडल्यानंतर आता राहुल की पंत हा प्रश्न निर्माण झाला आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे () अध्यक्ष यांनी याप्रकरणी आपले मत व्यक्त केले आहे. मर्यादित षटकांच्या म्हणजे वन-डे आणि टी-२० क्रिकेटमध्ये लोकेश राहुलने चांगली कामगिरी केली आहे. कसोटी क्रिकेटमध्येही राहुलकडून अशाच कामगिरीची अपेक्षा आहे, असे सौरव गांगुली यांनी म्हटले आहे. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली यासंदर्भातील निर्णय घेतो. याला यष्टीरक्षणासाठी पाठवणे, हा कर्णधार आणि संघ व्यवस्थापनाचा निर्णय आहे, असे गांगुली यांनी सांगितले. आगामी टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी यष्टीरक्षकाच्या शर्यतीत कोण-कोण आहे, या प्रश्नावर बोलताना, भारतीय संघाचे निवडकर्ते, संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री याबाबत निर्णय घेतील. ते ज्याची निवड करतील, तो भारतीय संघात असेल, असे सौरव गांगुली यांनी सांगितले. दरम्यान, भारतीय संघ व्यवस्थापनाने न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी ऋषभ पंतऐवजी लोकेश राहुलला संघात स्थान दिले. राहुलने निवड सार्थ ठरवत पहिल्या टी-२० सामन्यात ५६ धावांचे मोलाचे योगदान दिले होते.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3aRNoVs
No comments:
Post a Comment