नवी दिल्ली : आयपीएलचा मेगा लिलाव येत्या काही दिवसांमध्येच होणार आहे. पण या लिलावासाठी सर्वाधिक आयपीएल जिंकलेल्या मुंबई इंडियन्सचे बजेट नेमकं आहे तरी किती, ही माहिती आता समोर आले आहे. कारण लिलावापूर्वी मुंबईने चार खेळाडूंना संघात कायम ठेवण्याचा निर्णय घेतला होता, त्यानुसार आता मुंबई इंडियन्सचे आयपीएलसाठीचे बजेट ठरले आहे. बई इंडियन्सकडे आयपीएलसाठी किती बजेट असेल, पाहा...मुंबई इंडियन्सने लिलावापूर्वीच रोहित शर्मासह चार खेळाडूंना संघात कायम ठेवले आहे. यामध्ये जसप्रीत बुमरा, सूर्यकुमार यादव आणि कायरन पोलार्ड यांचा समावेश आहे. रोहितसाठी मुंबई इंडियन्सने १६ कोटी रुपये मोजले आहेत, तर बुमरा त्यांनी १२ कोटी रुपये दिले आहेत. मुंबई इंडियन्ससाठी तिसरा सर्वात महगडा खेळाडू ठरला आहे सूर्यकुमार यादव. कारण मुंबई इंडियन्सने सूर्यकुमार यादवसाठी आठ कोटी रुपये एवढी रक्कम मोजली आहे. मुंबई इंडियन्सने एवढी रक्कम उपकर्णधार कायरन पोलार्डलाही दिलेली नाही. मुंबई इंडियन्सने पोलार्डला संघात कायम ठेवण्यासाठी सहा कोटी रुपये मोजले आहे. त्यामुळे आता मुंबई इंडियन्सने चार खेळाडूंसाठी आतापर्यंत ४२ कोटी रुपये खर्च केले आहेत. त्यामुळे आता मुंबई इंडियन्सकडे ४८ कोटी एवढी रक्कम शिल्लक आहे. या ४८ कोटी रुपयांमध्ये मुंबईच्या संघाला आता जवळपास २०-२५ खेळाडू संघात घ्यावे लागू शकतात. त्यामुळे आता ४८ कोटी रुपयांमध्ये मुंबई इंडियन्सचे खेळाडू किती आणि कोणत्या खेळाडूंना आपल्या संघात स्थान देते, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल. त्यामुळे यावेळी आयपीएलच्या मेगा लिलावाकडे सर्वांचेच लक्ष लागलेले असेल. दुसरीकडे आयपीएलमध्ये मेगा लिलावासाठी सर्वाधिक रक्कम ही पंजाब किंग्स या संघाकडे शिल्लक आहे. कारण पंजाबच्या संघाने दोनच खेळाडूंना कायम ठेवले आहे आणि त्यासाठी त्यांनी १६ कोटी रुपये मोजले आहेत. त्यामुळे पंजाबच्या संघाकडे आता एकूण ७२ कोटी रुपये शिल्लक आहेत. त्यामुळे आता लिलावात मोठी बोली ते लावू शकतात आणि दिग्गज खेळाडूंना संघात स्थान देऊ शकतात.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/TZjKhOrNC
No comments:
Post a Comment