नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून आयपीएलमध्ये नव्याने दाखल झालेल्या लखनौ सुपरजायंट्स संघाने एकामागून एक धडाका लावलेला आहे. आज तर लखनौच्या संघाने एकच धमाका उडवून दिला आहे. लखनौच्या संघाने ट्विट करत एक महत्वाची माहिती क्रिकेट चाहत्यांना दिली आहे. लखनौच्या संघाने काही दिवसांपूर्वी आपला कर्णधार लोकेश राहुल असेल आणि आयपीएलमध्ये सर्वाधिक १७ कोटी रुपये त्याला देणार असल्याचे जाहीर केले. आज लखनौच्या संघाने ट्विट करत आपल्या संघाचा लोगो जाहीर केला आहे. या लोगोमध्ये त्यांनी गरुड पक्ष्याचा वापर केला आहे. याबाबत लखनौच्या संघाने सांगितले आहे की, " गरुड हा पक्षी आपल्याला पुराणापासून माहिती आहे. गरुड हा भरारी घेतो आणि तो उत्तम संरक्षकही असतो. त्यामुळे आम्ही गरुडाचा उपयोग हा आमच्या लोगोसाठी केला आहे." गरुड हा भरारी घेणारा पक्षी आहे. त्याच्यासारखी भरारी अन्य पक्ष्यांना घेता येत नाही, त्यामुळे आपल्या संघानेही आयपीएलमध्ये अशीच भरारी घ्यावी, हा उद्देश संजीन गोएंका यांच्या ग्रुपचा असावा, असे पाहायाल मिळत आहे. त्यामुळे आता आपल्या पहिल्याच मोसमात लखनौचा संघ गरुड भरारी घेतो का, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल. लखनौच्या संघाने यावेळी सर्वात जास्त बोली लावत संघ विकत घेतला होता. तेव्हापासून संजीन गोएंका ग्रुप हा सातत्याने प्रकाशझोतात राहीला आहे. हा ग्रुप फक्त तेवढ्यावरच थांबला नाही, तर त्यांनी आयपीएलमधील सर्वाधिक मानधन देण्याचाही विक्रम केला आहे. आतापर्यंत आयपीएलमधील कर्णधाराला १५-१६ कोटी रुपये एवढे मानधन मिळत होते. पण लखनौच्या संघाने तब्बल १७ कोटी रुपये मोजत लोकेश राहुलला कर्णधार केले आहे. त्याचबरोबर आपल्या संघाला लोगोही त्यांनी कल्पकपणे बनवला आहे. या लोगोमध्ये त्यांनी गरुडाचा वापर केला तर आहेच, पण त्याचबरोबर या लोगोमध्ये बॅट आणि बॉल वापरायलाही ते विसरले नाहीत. स्पर्धा सुरु होण्यापूर्वीच लखनौचा संघ एकामागून एक दणक्यात पावलं टाकत आहे, त्यामुळे आता लिलावात हा संघ काय करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/sTpRe4B0W
No comments:
Post a Comment