पार्ल : लोकेश राहुलने वनडे संघाचे कर्णधारपद भूषणवण्यापूर्वीच टीम इंडियाची चिंता वाढवलेली आहे. पहिल्या वनडे सामन्यापूर्वी पत्रकार परिषद घेण्यात आली. यामध्ये राहुलने म्हटलेल्या एका वाक्यानेच घात केल्याचे आता समोर आले आहे. पत्रकार परिषदेमध्ये राहुल नेमकं काय म्हणाला, पाहा...रोहितच्या अनुपस्थित कर्णधारपद भूषवणारा राहुल आज पत्रकार परिषदेत आला होता. यावेळी राहुल म्हणाला की, " गेल्या काही दिवसांमध्ये मी भारताच्या वनडे संघात मधल्या फळीत फलंदाजीला येत होतो, पण आता रोहित शर्माच्या अनुपस्थितीत मी सलामीला खेळायला येणार आहे." या एकाच वाक्याने भारतीय संघाची चिंता वाढवली आहे. कारण सामन्याच्या पूर्वसंध्येलाच राहुलने संघाची रणनिती स्पष्ट केली आहे आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे भारतीय संघात युवा सलामीवीर असताना राहुलने हे वक्तव्य केले आहे. संघाचा कर्णधार या नात्याने तुम्ही संघाचा विचार करायचा असतो, कर्णधार झाल्यावर तुम्ही स्वत:पुरता विचार करून चालत नाही. राहुलने सलामीला येण्याचे म्हणतानाच शिखर धवनला या सामन्यात संधी देणार असल्याचेही संकेत दिले आहेत. त्यामुळे ऋतुराज गायकवाड, इशान किशन आणि वेंकटेश अय्यर या तिन्ही सलामीवीरांना पहिल्या सामन्यात तरी संधी मिळणार नसल्याचे राहुलने स्पष्ट केले आहे. ही मालिका तीन सामन्यांची आहे, त्यामुळे एवढ्या कमी वनडे सामन्यांच्या मालिकेत संघात मोठे बदल होणार नाही. त्यामुळे ऋतुराज, वेंकटेश आणि इशानसारख्या युवा सलामीवीरांना या मालिकेत संधी मिळणार की नाही, याबाबत आता साशंकता व्यक्त केली जात आहे. द्रविड हे विश्वचषकासाठी भारताचा संघ बांधत असल्याचे सर्वांनाच माहिती आहे. जर विश्वचषकासाठी संघबांधणी करायची असेल तर त्यासाठी प्रयोग हे करावे लागतील आणि त्यानंतरच तुम्ही योग्य तो खेळाडू निवडू शकता. पण आता लोकेशने सामन्यापूर्वीच आपण सलामीला येणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे द्रविड यांना आता संघात प्रयोग करता येणार नाही. लोकेशला जरी सलामीला यायचे होते, तर त्याने ही गोष्ट सर्वांसमोर सामन्याच्यापूर्वी सांगायला नको होती, असे चाहत्यांना वाटत आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3IhpJxC
No comments:
Post a Comment