Ads

Friday, January 28, 2022

...तर सचिन तेंडुलकरने एक लाख धावा केल्या असत्या, शोएब अख्तरचं मास्टर-ब्लास्टरबाबत मोठं विधान

नवी दिल्ली : क्रिकेट विश्वात सर्वाधिक धावा भारताचा माजी महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरच्याच नावावर आहेत. सचिनने निवृत्ती घेतल्यावर ९ वर्षे झाली असली तरी त्याचा हा विश्वविक्रम अजूनही अबाधित आहे. पण जर एक गोष्ट असली असती तर सचिन तेंडुलकरने एक लाख धावा केल्या असत्या, असे वक्तव्य आता पाकिस्तानच्या शोएब अख्तरने केले आहे. कोणती गोष्ट असली असती तर सचिनने एवढ्या धावा केल्या असत्या, पाहा...शोएब यावेळी म्हणाला की, " आता क्रिकेटच्या नियमांमध्ये बरेच बदल झाले आहेत. पण या गोष्टी सचिन खेळत असताना नव्हत्या. सध्याच्या घडीला प्रत्येक संघाला तीन रीव्ह्यू करण्याची संधी दिली जाते. जर हा नियम सचिन खेळत असताना असला असता तर सचिन तेंडुलकरच्या नावावर एक लाख धावा जमा झाल्या असत्या." सचिन खेळत असताना त्याला सदोष पंचगिरीचा बऱ्याचवेळा फटका बसल्या. पंचांच्या चुकीच्या निर्णयामुळे सचिन बऱ्याचदा मोक्याच्या क्षणी बाद झाला. एकदा तर ऑस्ट्रेलियात खेळताना सचिनच्या खांद्याला चेंडू लागला होता, तेव्हा पंच हार्पर यांनी त्याला पायचीत बाद दिले होते. यानंतर एकच वादंग निर्माण झाला होता, पण अशा बऱ्याच घडला सचिनबाबत घडल्याचे सर्वांनीच पाहिले आहे. सचिनला बऱ्यादचा पंच बकनर यांनी चुकीचे बाद दिल्याचा आरोप बऱ्याच चाहत्यांनी केला होता. त्यामुळे त्यावेळी डर रीव्ह्यू घ्यायचा नियम असला असता तर सचिनला अजून बऱ्याच धावा करता आल्या असत्या, हीच गोष्ट आता अख्तरनेही बोलून दाखवली आहे. शोएब अख्तर विराट कोहलीबाबत काय म्हणाला होता, पाहा...कोहलीबाबत अख्तर म्हणाला की, " विराटबाबत जे काही झालं ते झालं, यामध्ये काय चुकीचं होतं आणि काय बरोबर हे बोलण्यात काहीच अर्थ नाही. आता यापुढे काय करायला हवं, याचा त्याने विचार करायला हवा. त्याच्या हातामध्ये आता फक्त बॅट आहे, त्याला कोणत्याही संघातून बाहेर जाऊन चालणार नाही. आता तर त्याच्यावर दडपण असणारच. जर कामगिरीचे दडपण त्याच्यावर सर्वात जास्त असेल. माझ्यामते त्याने १२० शतकं करायला हवी होती आणि लग्नही त्याने खेळणं पूर्ण झाल्यावर करायला हवं होतं. जर मी भारताच वेगवान गोलंदाज असलो असतो तर मी कधीच लग्न केलं नसतं. मी पहिल्यांदा ४०० विकेट्स मिळवण्याचं काम केलं असतं. पण लग्न करून अजून जबाबदारी वाढवून घेतली नसती. मी खेळलो असतो आयुष्याचा आनंद लुटला असता."


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/32IXeK2

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...