नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यात भारताला वनडे मालिकेत एकही सामना जिंकता आला नाही. भारताच्या वनडे संघात शिखर धवनचे पुनरागमन झाले होते. पण या दौऱ्यातून घरी परतल्यावर धवनच्या त्याच्या वडिलांनी कानाखालीच लगावली आहे. धवन आणि त्याचा वडिलांचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. दक्षिण आफ्रिकेचा दौरा संपल्यावर धवन आपल्या घरी परतला. घरी परतल्यावर धवनचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यामध्ये त्याच्या वडिलांनी धवनला विचारले की, ' तु, या रुममध्ये जाऊन आलास का?' त्यावर धवन म्हणतो की, ' तुमच्याकडे काही पुरावे आहेत का? तुम्ही वॉरंट आणलं आहे का?' त्यानंतर लगेचच धवनचे वडिल त्याच्या कानाखाली आवाज काढतात आणि त्याला त्या घरातील लादी पुसायला सांगतात. धवनने हा मजेदार व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ चाहत्यांना चांगलाच आवडला असून हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडीओखाली भारताचा माजी फिरकीपटू हरभजन सिंगने बेस्ट, अशी कमेंट केली आहे. त्याचबरोबर भारताचा आणि चेन्नई सुपर किंग्सचा सलामीवीर ऋतुराज गायकवाडने या पोस्टखाली हसण्याचे इमोजी पोस्ट केले आहेत. धवनचा हा व्हिडीओ क्रिकेट चाहत्यांच्याही पसंतीस उतरला आहे. त्यामुळे हा व्हिडीओ क्रिकेट जगतात चांगलाच व्हायरल झाला आहे. दक्षिण आफ्रिकेतील पहिल्या वनडे सामन्यात पुनरागमन करताना शिखरने अर्धशतक झळकावले होते. पण या सामन्यात शतक झळकावण्यापासून धवन वंचित राहीला होता. दक्षिण आफ्रिकेतील मालिकेत धवनने चांगली कामगिरी केली असली तरी त्याला या मालिकेत संघाला विजय मिळवून देता आला नाही. धवन हा एकहाती संघाला विजय मिळवून देतो, अशी त्याची ख्याती होती. पण या दौऱ्यात धवनने चांगली कामगिरी केली असली तरी त्याला संघाला विजय मात्र मिळवून देता आला नाही. आता धवनची भारताच्या वनडे संघातही निवड झाली आहे. या मालिकेत धलवन कशी कामगिरी करतो, याकडे सर्वांचे लक्ष असेल.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3u6IOPc
No comments:
Post a Comment