Ads

Monday, January 17, 2022

कर्णधार असावा तर असा'; विजयाचा आनंद साजरा करताना जिंकली सर्वांची मनं, व्हिडीओ झाला व्हायरल...

Ashes 2022 : होबार्ट : होबार्टमध्ये यजमान ऑस्ट्रेलियाने इंग्लंडविरुद्ध १४६ धावांनी विजय मिळवला. या सामन्यासह मालिका विजय साजरा करताना पॅट कमिन्सने केलेल्या एका कृतीमुळे सध्या त्याचे सगळीकडे कौतुक होत आहे. कमिन्सने अ‍ॅशेस मालिका विजय साजरा करण्यासाठी चौथ्या कसोटीचा हिरो उस्मान ख्वाजाला मंचावर आमंत्रित केले. तोपर्यंत त्याने त्याच्या सहकाऱ्यांना शॅम्पेन उडविण्यापासून रोखले होते. पॅट कमिन्सने ट्रॉफी आणली, तेव्हा काही खेळाडूंच्या हातात शॅम्पेन होती. त्यावेळी तिथे नव्हता. त्यानंतर कमिन्सने आपल्या सहकाऱ्यांना शॅम्पेन न उडविण्याचे आवाहन केले आणि ख्वाजाला पुन्हा संघाच्या आनंदात सामील होण्याचे आवाहन केले. यानंतर संपूर्ण संघाने मिळून अॅशेस मालिकेतील विजयाचा आनंद साजरा केला. पॅट कमिन्सचे हे वर्तन चाहत्यांना आणि क्रिकेटप्रेमींना आवडले असून सध्या त्याची जोरदार चर्चा होत आहे. अॅशेस मालिकेला सुरुवात होण्यास काही दिवस शिल्लक असताना टिप पेनवर लैंगिक छळाचे आरोप करण्यात आले. त्यामुळे त्याने कर्णधारपदाचा राजीनामा दिला आणि तो अॅशेसमधून बाहेर पडला. ऐनवेळी कर्णधारपदाची माळ गळ्यात पडल्यानंतर पॅट कमिन्सने ऑस्ट्रेलियाला ४-० असा अविस्मरणीय विजय मिळवून दिला. कमिन्सच्या कारकीर्दीची यापेक्षा चांगली सुरुवात होऊ शकली नसती. आपले कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या इंग्लंडला एकही सामना जिंकून दिला नाही आणि ४-०ने मालिका खिशात घातली. पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने फक्त अॅशेस मालिकाच राखली नाही, तर इंग्लंडवर पूर्णपणे वर्चस्व राखले. दोन्ही संघांमधली चौथा कसोटी सामना नाट्यमयरित्या बरोबरीत संपला. विजयापासून फक्त एक पाऊल लांब होते. तो सामना जिंकला असता तर कांगारुंनी पाहुण्या इंग्लंडला ५-० असा क्लीन स्वीप दिला असता. ख्वाजा-कमिन्सची चमकदार कामगिरी उस्मान ख्वाजाने जवळपास तीन वर्षांनी ऑस्ट्रेलियन कसोटी संघात पदार्पण केले. सिडनी येथे खेळल्या गेलेल्या चौथ्या कसोटीत ख्वाजाला संधी मिळाली आणि त्याने दोन्ही डावात शतके झळकावून आपल्या पुनरागमनाला चार चाँद लावले. ट्रॅव्हिस हेडने होबार्ट कसोटीत पुनरागमन केले, तेव्हा ख्वाजाला डेव्हिड वॉर्नरसह सलामीला मैदानात उतरावे लागले, पण मोठी खेळी करण्यात तो अपयशी ठरला. दुसरीकडे, या अॅशेस मालिकेत सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला. त्याने चार सामन्यांत २१ विकेट घेतल्या आहेत. त्याने गाबा येथील पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात ६ बळी घेत ऑस्ट्रेलियालाच्या अॅशेस मोहिमेला विजयी सुरुवात करून दिली होती.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/34SoBSt

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...