पार्ल : दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताचा पराभव झाला, त्यांना मालिका गमवावी लागली, पण त्यानंतर भारताचा कर्णधार लोकेश राहुल मैदानात बिथरल्याचे पाहायला मिळाले. कारण मैदानात जे काही राहुलने केले त्यानंतर त्याची मानसीक अवस्था ठीक नसल्याचे म्हटले जात आहे. पराभवानंतर राहुलने मैदानात नेमकं केलं तरी काय, पाहा...पहिल्या सामन्यात दुसरी फलंदाजी केल्यामुळे भारताचा पराभव झाला, असे म्हटले गेले. पण दुसऱ्या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी केला आणि तरीही त्यांना विजय मिळवता आला नाही. दुसऱ्या सामन्यात तर भारताला मानहानीकारक पराभव पत्करावा लागला. या पराभवाचा मोठा धक्का राहुलला बसला आणि तो बिथरल्याचे पाहायला मिळाले. दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर जेव्हा राहुलला प्रेझेंटेशनसाठी बोलावण्यात आले, तेव्हा राहुल म्हणाला की, " दुसरा सामना खेळताना उन्ह जास्त होतं, त्यामुळे जास्त गर्मी जाणवत होती. त्यामुळे शरीरला खेळणे हे फार सोपे नव्हते. बायो-बबलमध्ये राहणे ही एक आव्हानात्मक गोष्ट आहे, पण आम्हाला आव्हानात्मक गोष्टी आवडत नाही, असे नाही. गेल्या दिवसांमध्ये आम्ही वनडे क्रिकेट खेळलेलो नाही, वनडे क्रिकेट खेळून आम्हाला बराच कालावधी झाला आहे." जय-पराजय हे सामन्यात होत असतात, पण आतापर्यंत कोणतेच कर्णधार अशा संबंध नसलेल्या गोष्टी बोलून दाखवत नव्हते. भारताचे क्रिकेटपटू हे व्यावसायिक आहेत आणि त्यांनी अशी कारणं आतापर्यंत दिली नव्हती. पण या पराभवाच्या धक्क्यातून राहुल हा बाहेर आलेला दिसत नाही. सामना संपल्यावर राहुल जे म्हणाला त्यावरून त्याची मानसीकता कशी आहे, हेदेखील आता समोर आले आहे. जेव्हा तुम्ही व्यावसायिक खेळाडू असता आणि एका दिग्गज संघाचे तुम्ही नेतृत्व करत असता, तेव्हा पराभवानंतर अशी कारणं देऊन तुम्हाला चालत नाहीत. पण राहुलने मात्र तीच गोष्ट केल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे भविष्यात एक कर्णधार म्हणून राहुलकडे पाहायचे की नाही, याचा गंभीरपणे विचार आता भारताच्या निवड समितीला करावा लागणार आहे. राहुल जर पराभवानंतर अशीच कारणं देत राहीला तर त्याला संघाचे नेतृत्व कसे द्यायचे, असा प्रश्नही निवड समितीच्या मनात येऊ शकतो.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/33Um4GY
No comments:
Post a Comment