मुंबई : रोहित शर्माला आता मुंबई इंडियन्सचा संघ अजून एक महत्वाची जबाबदारी देणार असल्याचे समोर आले आहे. येत्या काही दिवसांमध्येच रोहित या नवीन जबाबदारीमध्ये सर्वांनाच दिसणार आहे. मुंबई इंडियन्सने रोहित शर्माला कोणती मोठी जबाबदारी दिली आहे, पाहा...रोहित हा आयपीएलमधील सर्वात यशस्वी कर्णधार ठरला आहे, मुंबई इंडियन्सला त्याने सर्वाधिकवेळा जेतेपद मिळवून दिले आहे. त्यामुळे आता मुंबई इंडियन्सच्या संघाने रोहितला एक नवीन जबाबदारी सोपवण्याचे ठरवले असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. आयपीएलचा मेगा लिलाव हा फेब्रुवारी महिन्यातील १२ आणि १३ तारखेला होणार आहे. या लिलावात रोहित हा सहभागी झालेला दिसू शकतो. आतापर्यंत आयपीएलच्या लिलावात कधीच मुंबई इंडियन्सचा कर्णधार सहभागी झाला नव्हता, अन्य संघांचेही कर्णधार आतापर्यंत लिलावामध्ये सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले नाहीत. त्यामुळे रोहित हा पहिला कर्णधार असेल जो आयपीएलच्या लिलावात सहभागी होणार आहे. यासाठी रोहितनेही आता कंबर कसल्याचे पाहायला मिळत आहे. आपला संघ कसा असावा, यासाठी रोहित आयपीएलच्या सहाय्यक प्रशिक्षकांबरोबर रणनिती आखत असल्याचे समजते आहे. कारण आयपीएलच्या लिलावात कोणत्या खेळाडूंना आपल्या ताफ्यात दाखल करायचे, याचा विचार सध्याच्या घडीला मुंबई इंडियन्सचा संघ करत आहे. मुंबई इंडियन्सने आज एक ट्विटरवर पोस्टही केली आहे. त्यामध्ये त्यांनी रोहितचा फोटो वापरला आहे, पण त्यांनी यावेळी आपली स्पष्ट भूमिका मांडलेली नाही. पण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रोहित सध्याच्या घडीला संघबांधणीसाठी प्रयत्न करत आहे. रोहित हा दुखापतीमधून सध्या सावरत आहे. दुखापतीमुळे तो दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर गेला नव्हता. रोहितच्या अनुपस्थितीत भारताला दक्षिण आफ्रिकेत कसोटीपाठोपाठ एकदिवसीय मालिकाही गमवावी लागली आहे. त्यामुळे आता वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत रोहित संघात परतणार का, याची उत्सुकता सर्वांना लागलेली असेल. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील वनडे मालिका ६ फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे, तर तीन ट्वेन्टी-२० सामन्यांची मालिका १६ फेब्रुवारीपासून सुरु होईल..
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/33N0Z1t
No comments:
Post a Comment