पार्ल : पहिल्या वनडे सामन्यात भारतीय संघाला ३१ धावांनी पराभव पत्करावा लागला. पण या सामन्यात सर्वांची मनं जिंकली ती शार्दुल ठाकूरने. या सामन्यात शार्दुलने दमदार कामगिरी करत एक महत्वाचा विक्रम आपल्या नावावर केला आहे. शार्दुल ठाकूरने कोणता विक्रम रचला आहे, पाहा...दक्षिण आफ्रिकेच्या २९७ धावांचा पाठलाग करताना भारताची ६ बाद १८८ अशी अवस्था झाली होती आणि सर्व महत्वाचे फलंदाज बाद झाले होते. त्यावेळी भारताचा मोठा पराभव होईल, असे सर्वांनाच वाटले होते. पण त्यावेळी शार्दुल संघाच्या मदतीसाठी धावून आला. शार्दुलने तळाच्या फलंदजांना साथीला घेतले आणि अखेरच्या षटकापर्यंत खिंड लढवली. शार्दुल फक्त खेळपट्टीवर उभा राहीला नाही तर त्याने धडाकेबाज फलंदाजी करत धावाही वसूल केल्या. त्याचबरोबर शार्दुलने या सामन्याच्या अखेरच्या चेंडूवर एक धाव घेतली आणि वनडे क्रिकेटमध्ये आपले पहिले अर्धशतक झळकावत विक्रम रचला. शार्दुलने यावेळी ४३ चेंडूंमध्ये पाच चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर नाबाद ५० धावांची खेळी साकारली आणि त्यामुळेच भारताला मानहानीकारक पराभव टाळता आला. शार्दुलकडे एक अष्टपैलू खेळाडू म्हणून पाहिले जात आहे आणि त्याची चुणूक पुन्हा एकदा शार्दुलने दाखवून दिली. पण त्याला फलंदाजीमध्ये यापुढे बढती मिळणार की नाही, हा सर्वात मोठा प्रश्न आहे. शार्दुलने यावेळी जसप्रीत बुमराला साथीला घेत नवव्या विकेटसाठी ५१ धावांची अभेद्य भागीदारी रचली. जर शार्दुलला बढती मिळाली असती तर कदाचित त्याने सामन्याचे रुप बदलले असते, अशी चर्चा क्रिकेट वर्तुळात सुरु आहे. शार्दुल आपली १० षटके गोलंदाजी करतो आणि त्यानंतर उपयुक्त फलंदाजी करत असल्याचे पुन्हा एकदा पाहायला मिळाले आहे. आज गोलंदाजीमध्ये शार्दुलचा चांगली चमक दाखवता आली नव्हती. पण ही कसर त्याने फलंदाजीमध्ये भरून काढल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे आता दुसऱ्या सामन्यात त्याच्या गोलंदाजीमध्ये कशी सुधारणा होते आणि त्याला फलंदाजीमध्ये बढती मिळते का, याकडे सर्वांचे लक्ष असेल.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3KogvBs
No comments:
Post a Comment