नवी दिल्ली : भारतीय संघात असे तीन खेळाडू आहेत की जे भविष्यातील तारे ठरू शकतात. त्यासाठी त्यांना जास्त संधी देणे गरजेचे आहे, असे भारताचे माजी कर्णधार आणि समालोचक सुनील गावस्कर यांनी सांगितले आहे. गावस्कर यांनी कोणत्या तीन खेळाडूंना संधी द्यायला सांगितली, पाहा...वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे आणि ट्वेन्टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची निवड करण्यात आली. त्यानंतर गावस्कर यांनी सांगितले की, " भारतीय संघात असे तीन खेळाडू आहेत की, ज्यांच्यावर नजर ठेवायला हवी. भविष्यात हे खेळाडू चांगली कामगिरी करू शकतात, पण त्यांना सातत्याने संधी देणेही गरजेचे आहे. भारतीय संघातील सूर्यकुमार यादव, दीपक चहर आणि प्रसिध कृष्णा यांना जास्त संधी द्यायला हवी. दक्षिण आफ्रिकेतील तिसऱ्या वनडे सामन्यात त्यांना संधी मिळाली होती, पण त्या सामन्याला काही अर्थ नव्हता. कारण त्या सामन्यापूर्वीच भारताने वनडे मालिका गमावलेली होती. पण तरीही त्या सामन्यात त्यांच्याकडून चांगली कामगिरी पाहायला मिळाली. दीपक चहरने तर अष्टपैलू कामगिरी करत निवड समितीला आपली दखल घेणे भाग पाडले. त्यामुळे या तिन्ही खेळाडूंना भविष्यात जर चांगल्या संधी मिळाल्या तर त्यांच्याकडून नक्कीच मोठी कामगिरी पाहायला मिळू शकते. पण त्यासाठी त्यांच्यावर संघाने विश्वास ठेवायला हवा आणि संधीही द्यायला हवी." भारताचा ट्वेन्टी-२० संघरोहित शर्मा (कर्णधार), लोकेश राहुल, इशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, व्यंकटेश अय्यर, दीपक चहर, शार्दुल ठाकूर, रवी बिष्णोई, अक्षर पटेल, युजवेंद्र चहल, वॉशिंग्टन सुंदर, मोहम्मद सिराज, भुवनेश्वर कुमार, आवेश खान आणि हर्षल पटेल. भारताचा वनडे संघरोहित शर्मा (कर्णधार), लोकेश राहुल, ऋतुराज गायकवाड, शिखर धवन, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, दीपक हुडा, रिषभ पंत, दीपक चहर, शार्दुल ठाकूर, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिष्णोई, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3u2x28f
No comments:
Post a Comment