![](https://maharashtratimes.indiatimes.com/photo/73628543/photo-73628543.jpg)
ऑकलंड: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा टी-२० सामना इडन पार्कवर रविवारी होणार आहे. पहिल्या टी-२० सामन्यात भारताने शानदार विजय मिळवला आहे. त्यामुळे दुसऱ्या सामन्यात संघात बदल होण्याची शक्यता नाही. असे असेल तरी गोलंदाजीत काही बदल होऊ शकतात. पहिल्या टी-२० सामन्यात जसप्रीत बुमराहने प्रति ओव्हर आठ धावा दिल्या होत्या. तर मोहम्मद शमीने ४ षटकात ५३ धावा देत एकही विकेट घेतली नाही. शार्दुल ठाकूरने ३ षटकात ४४ धावा देत एक विकेट घेतली होती. त्यामुळे गोलंदाजीमध्ये भारतीय संघ बदल करण्याची शक्यता आहे. बुमराह आणि शमी या मुख्य गोलंदाज असल्यामुळे त्यांना संघात स्थान मिळेल. ठाकूरच्या ऐवजी नवदीप सैनीला संघात स्थान मिळण्याची शक्यता आहे. किंवा दोन जलद गोलंदाज आणि तीन फिरकीपटू असा पर्याय देखील विराटकडे आहे. तसे झाल्यास युजवेंद्र चहल आणि रविंद्र जडेजासह कुलदीप यादवला संधी मिळू शकते. फिरकीपटूचा समावेश करायचा झाल्यास वॉशिंग्टन सुंदर हा पर्याय देखील आहे. मधळ्या फळीतील चिंता मिटली पहिल्या सामन्यात श्रेयश अय्यरने २९ चेंडूत नाबाद ५८ धावा केल्या. त्याच्या या खेळीने संघातील चौथ्या स्थानाची चिंता मिटली आहे. न्यूझीलंडने विजयासाठी दिलेले २०४ धावांचे आव्हान भारताने श्रेयसच्या खेळीमुळे पार केले आणि मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. न्यूझीलंड दौऱ्या आधी क्रमांक चारवरून संघात काळजीचे वातावरण होते. पण श्रेयसच्या खेळीने ती मिटली आहे. श्रेयसने गेल्या सप्टेंबरपासून १२ टी-२० सामन्यातील ११ डावात ३४.१४च्या सरासरीने दोन अर्धशतक केली आहेत. त्याचा स्ट्राइक रेट १५४.१९ इतका आहे. संभाव्य संघ- भारत : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, लोकेश राहुल (यष्टिरक्षक), ऋषभ पंत, संजू सॅमसन, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, मनीष पांडे, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, यजुर्वेद्र चहल, मोहम्मद शमी, श्रेयस अय्यर, जसप्रीत बुमरा, शार्दूल ठाकूर, नवदीप सैनी. न्यूझीलंड : केन विल्यम्सन (कर्णधार), मार्टिन गप्टिल, रॉस टेलर, स्कॉट कुगेलेइन, कॉलिन मुन्रो, कॉलिन डी ग्रँडहोम, टॉम ब्रूस, डॅरेल मिचेल, मिशेल सँटनर, टिम सेफर्ट (यष्टिरक्षक), हॅमिश बेनेट, ईश सोधी, टिम साऊदी, ब्लेअर टिकनर.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3aSErv4
No comments:
Post a Comment