ऑकलंड: न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात भारताचा हिटमॅन रोहित शर्माला एक खास विक्रम स्वत:च्या नावावर करण्याची संधी आहे. इडन पार्कवर याआधी झालेल्या पहिल्या सामन्यात भारताने न्यूझीलंडचा ६ विकेटनी पराभव केला होता आणि मालिकेत १-० अशी आघाडी घेतली होती. पहिल्या सामन्यात रोहित फक्त ७ धावा करून बाद झाला. पण आता दुसऱ्या सामन्यात रोहितने धमाकेदार खेळी करावी अशी सर्वाची इच्छा आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात रोहितने ५६ धावा केल्यास आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ओपनर म्हणून त्याच्या १० हजार धावा पूर्ण होतील. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अशी कामगिरी आतापर्यंत फक्त तिघा भारतीय क्रिकेटपटूंनी केली आहे. वाचा- भारताकडून मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, सुनील गावस्कर आणि विरेंद्र सेहवाग यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ओपनर म्हणून १० हजार धावा केल्या आहेत. गावस्कर यांनी ओपनर म्हणून १२ हजार २५८, विरेंद्र सेहवागने १६ हजार ११९ तर सचिन तेंडुलकरने १५ हजार ३१० धावा केल्या आहेत. रोहितने आतापर्यंत ३६१ आंतरराष्ट्रीय सामन्यात १३ हजार ८९६ धावा केल्या आहेत. त्यात ३९ शतके आणि ७२ अर्धशतकांचा समावेश आहे. रोहितने २१९ सामन्यात ओपनर म्हणून ९ हजार ९४४ धावा केल्या आहेत. टी-२०चा विचार केल्यास १०५ टी-२० सामन्यात त्याने ४ शतक आणि १९ अर्धशतकांसह २ हजार ६४० धावा केल्या आहेत.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2vnHwD4
No comments:
Post a Comment