
चेन्नई: भारत आणि इंग्लंड () यांच्यात पुढील महिन्यापासून चार सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. मालिकेतील पहिली लढत चेन्नईत पाच फेब्रुवारीपासून सुरू होईल. या मैदानावर भारतीय संघाची कामगिरी शानदार अशी आहे. त्यामुळे भारतीय संघाचे पारडे जड मानले जाते. त्याच टीम इंडियाने नुकताच ऑस्ट्रेलियाविरुद्धची कसोटी मालिका जिंकली आहे. अशीच कामगिरी भारत पुन्हा करण्यास उत्सुक असेल. वाचा- परदेशात मालिका विजय मिळवणारा भारतीय संघ मायदेशात देखील विजय मिळवण्याचा प्रयत्न करेल यासाठीच संघात अव्वल फिरकीपटूंना स्थान मिळण्याची शक्यता आहे. गेल्या वेळी म्हणजेच २०१६ साली जेव्हा इंग्लंड भारत दौऱ्यावर आला होता. तेव्हा आर अश्विन आणि रविंद्र जडेजा यांनी मिळून इंग्लंडच्या ९३ पैकी ५४ विकेट घेतल्या होत्या आणि भारताने पाच सामन्यांची मालिका ४-० ने जिंकली होती. वाचा- या वेळी अंगठ्याच्या फॅक्चर रविंद्र जडेजा इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटीत खेळू शकणार नाही. त्यामुळे कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर आणि अक्षर पटेल यापैकी एकाला अश्विन सोबत संघात घेतले जाऊ शकते. जडेजाने कसोटीत घेतलेल्या २२० विकेटपैकी १५७ विकेट भारतात घेतल्या आहेत. ९ वेळा त्याने पाच किंवा त्यापेक्षा अधिक विकेट घेतल्या आहेत. पण आता जडेजा नसताना संघाला कमी अनुभवी फिरकीपटूला संघात घ्यावे लागेल. चेन्नईत होणाऱ्या पहिल्या दोन कसोटीत भारताकडे उपलब्ध असलेल्या फिरकीपटूंपैकी कुलदीपकडे ६, सुंदरकडे १ तर अक्षर पटेलकडे एकाही कसोटीचा अनुभव नाही. वाचा- इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत भारत पाच गोलंदाजांसह मैदानात उतरण्याची शक्यता आहे. यात सुंदरसह तीन फिरकीपटू असू शकतात. कुलदीप यादवला देखील संधी मिळू शकते. त्याने नेटमध्ये खुप सराव केला आहे. पण ऑस्ट्रेलिया दौऱ्यात संधी मिळाली नव्हती. वाचा- कुलदीपने गेल्या दोन वर्षात एकही कसोटी सामना खेळलेला नाही. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात सिडनीत अ संघाविरुद्धच्या सामन्यात १६ ओव्हरमध्ये त्याने एकही विकेट घेतली नव्हती. त्यामुळेच कुलदीपच्या जागी सुंदरला संधी मिळण्याची शक्यता अधिक आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अखेरच्या कसोटीत त्याने गोलंदाजी आणि फलंदाजी चांगली कामगिरी केली होती. चेन्नई हे सुंदर आणि अश्विनचे घरचे मैदान आहे. याचा फायदा घेण्याचा टीम इंडिया प्रयत्न करेल.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/39ZWOOY