ऑकलंड: ऑस्ट्रेलियासारख्या तगड्या संघाचा पराभव केल्यानंतर भारतीय संघ न्यूझीलंडमध्ये दाखल झाला आहे. भारताच्या न्यूझीलंड दौऱ्याची सुरूवात टी-२० मालिकेपासून होणार आहे. मालिकेतील पहिला सामना आज होणार आहे. या वर्षी ऑस्ट्रेलियात होणाऱ्या आयसीसी टी-२० वर्ल्ड कपच्या दृष्टीने दोन्ही संघांसाठी ही मालिका अत्यंत महत्त्वाची आहे. ऑकलंड येथील ईडन पार्क मैदानावर भारतीय संघ न्यूझीलंडला आव्हान देणार आहे. न्यूझीलंड गेल्यावर्षी इंग्लंडमध्ये झालेल्या आयसीसी वर्ल्ड कप स्पर्धेतील सेमीफायनलमध्ये भारताचा पराभव केला होता. या पराभवानंतर भारत प्रथमच न्यूझीलंडविरुद्ध खेळत आहे. वाचा- अशी असेल खेळपट्टी ईडन पार्कवरील खेळपट्टी फलंदाजीसाठी सर्वोत्तम मानली जाते. या मैदानावर झालेल्या १९ टी-२० सामन्यातील ३८ डावात एकूण २४ वेळा १५०हून अधिक धावा झाल्या आहेत. त्यामुळे यांच्यातील लढतीत देखील चौकार आणि षटकारांचा पाऊस पडू शकतो. मैदान लहान असल्यामुळे मोठी धावसंख्या होऊ शकते. वाचा- हवामान ऑकलंडमध्ये पावसाची शक्यता नाही. तापमान २२ डिग्रीच्या आसपास असेल. पण दव असल्यामुळे त्याचा परिणाम सामन्यावर होऊ शकतो. रेकॉर्ड- ICC टी-२० क्रमवारी भारत- ५ न्यूझीलंड-६ एकूण सामने- ११ भारत- ३ न्यूझीलंड- ८ संभाव्य संघ- भारत : (कर्णधार), रोहित शर्मा, लोकेश राहुल (यष्टिरक्षक), मनीष पांडे, ऋषभ पंत, संजू सॅमसन, श्रेयस अय्यर, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, यजुर्वेंद्र चहल, मोहम्मद शमी, जसप्रित बुमरा, शार्दूल ठाकूर, नवदीप सैनी, वॉशिंग्टन सुंदर. न्यूझीलंड : केन विल्यम्सन (कर्णधार), मार्टिन गप्टिल, रॉस टेलर, स्कॉट कुगेलेइन, कॉलिन मुन्रो, कॉलिन डी ग्रँडहोम, टॉम ब्रूस, डॅरेल मिचेल, मिशेल सँटनर, टिम सेफर्ट (यष्टिरक्षक), हॅमिश बेनेट, इश सोधी, टिम साऊदी, ब्लेअर टिकनर.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2GjDGwR
No comments:
Post a Comment