मुंबई: भारताविरुद्धच्या पहिल्या भारताविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यात कर्णधार विराट कोहलीने रोहित शर्मा, शिखर धवन आणि के.एल. राहुल या तिघांनाही संधी दिली आहे. या मैदानावर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात १३ वर्षानंतर सामना होत आहे. २०१२पासून वानखेडेवर झालेल्या दोन सामन्यात भारताचा पराभव झाला आहे. गेल्यावर्षी इंग्लंडमध्ये झालेल्या वर्ल्ड कप स्पर्धेनंतर ऑस्ट्रेलियाने एकही वनडे सामना खेळला नाही. ही गोष्ट भारतासाठी जमेची ठरू शकते. संबंधीत बातम्या- LIVE अपडेट- ( Live Update ) >> पहिल्याच चेंडूवर रोहितचा चौकार >> रोहित शर्मा आणि शिखर धवन यांनी केली भारताच्या डावाची सुरुवात >> कर्णधार विराट कोहलीचा मोठा निर्णय- रोहित, शिखर आणि राहुल तिघांना संधी >> ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकली, प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2NnCA7m
No comments:
Post a Comment