म. टा. क्रीडा प्रतिनिधी, मुंबई ‘ऐन लढतच नव्हे, तर अगदी सरावातही त्याच ताकदीने आणि इर्ष्येने मारा करत असतो. त्यामुळे आम्ही त्याचे संघसहकारी असलो तरी सरावात आमच्या बरगड्या आणि डोक्यावर नेम धरायलाही तो मागेपुढे बघणार नाही’- इति . आपल्या संघाचा प्रमुख गोलंदाज आणि सध्याच्या क्रिकेटमधील यशस्वी तेज गोलंदाज असलेल्या जसप्रीत बुमराहविषयी विराट कोहलीने काढलेले हे कौतुगोद्गार. ‘मला विचाराल तर बुमराह हा क्रिकेटच्या तीनही प्रकारांतील सर्वात कुशल गोलंदाज आहे. त्याच्याविरुद्ध खेळणे हे मोठे आव्हान असते. आम्ही नेट सरावात त्याचा सामना करतो तेव्हा आमच्या लक्षात येते. बुमराह सरावातही ऐन सामन्याप्रमाणेच इर्ष्येने मारा करतो. त्यामुळे आम्हालाही धडकी भरते’, असे विराटने सांगितले. सध्याच्या घडीला विराट हा जगातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी आहे. क्रिकेटच्या तीनही प्रकारांत विराटचा प्रभाव दिसून येतो आणि त्याच्याकडून बुमराहचे कौतुक होणे नक्कीच मोठी गोष्ट ठरते. स्टार्कचे आव्हान १)भारतीय संघात माझ्यासह मधल्या फळीतील सगळ्याच फलंदाजांपुढे ऑस्ट्रेलियाचा भेदक गोलंदाज मिचेल स्टार्कचे आव्हान असेल. स्टार्कची अचूकता, वेग, भेदकता हे सगळेच दर्जेदार आहे, असे विराटने सांगितले. २)स्विंगमध्ये स्टार्क तरबेज आहे. सराईतपणे तो चेंडू हवा तसा स्विंग करतो. हेच त्याचे प्रमुख अस्त्र आहे. ३)गेल्यावर्षी भारतात जिंकून गेला त्यापेक्षा आताच ऑस्ट्रेलिया संघ दमदार आहे. मात्र आम्हीदेखील मागे नाही. शिखर, राहुल दोघेही खेळतील भारताचा कर्णधार विराट कोहलीने सोमवारी संकेत दिले आहेत की, शिखर धवन आणि लोकेश राहुल या दोघांनाही अंतिम अकरामध्ये कदाचीत संधी मिळू शकते आणि त्यासाठी विराट स्वतः खालच्या क्रमांकावर फलंदाजी करण्यास तयार आहे! सलामीवीर म्हणून रोहित शर्माची निवड त्याच्या खणखणीत कामगिरीमुळे निश्चित आहेच. त्यामुळे त्याचा सलामीचा जोडीदार म्हणून अंतिम अकरामध्ये प्रवेश मिळवण्यासाठी लोकेश राहुल आणि शिखर धवन यांच्यात स्पर्धा आहे. मात्र विराटने आधीच या दोघांनाही संधी मिळण्याचे संकेत दिले आहेत.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/36PaKbS
No comments:
Post a Comment