मुंबई: भारतीय संघाचा कर्णधार गेल्या काही दिवसांपासून एकापाठोपाठ एक विक्रम स्वत:च्या नावावर करत आहे. गेल्या दहा वर्षात विराटने जगातील सर्वोत्तम फलंदाज म्हणून सिद्ध केले आहे. आता विराट आणखी एक विक्रम मोडण्यास सज्ज झाला आहे. हा विक्रम अन्य कोणाचा नसून विराटचा आदर्श असलेल्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा आहे. वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतक करण्याचा विक्रम सचिनच्या नावावर आहे. सचिनने वनडेमध्ये ४९ शतके केली आहेत. त्यापैकी २० शतके त्याने घरच्या मैदानावर केली आहेत. विराटने भारतात १९ शतके केली आहेत. उद्या ( १४ जानेवारी)पासून भारताची ऑस्ट्रेलियाविरुद्ध ३ सामन्यांची वनडे मालिका सुरू होत आहे. या मालिकेत विराटने दोन शतके केल्यास तो सचिनचा विक्रम मागे टाकू शकतो. वाचा- श्रीलंकेविरुद्ध नुकत्याच झालेल्या टी-२० मालिकेत विराटने कर्णधार म्हणून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात वेगाने ११ हजार धावा करण्याचा विक्रम केला होता. क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत विराट तिसऱ्या स्थानावर आहे. सचिनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक १०० शतके केली आहेत. त्यापाठोपाठ ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंगने ७१ शतके केली आहेत. तर विराटच्या नावावर ७० शतकांची नोंद आहे. विराटने कसोटीत २७ तर वनडेत ४३ शतके केली आहेत. वाचा- ऑस्ट्रेलियाचा संघ तीन वनडे सामन्यांच्या मालिकेसाठी भारत दौऱ्यावर आला आहे. मालिकेतील पहिला सामना मुंबईत १४ जानेवारी रोजी होणार आहे. दुसरा सामना राजकोट येथे १७ तारखेला तर तिसरी आणि अखेरची वनडे १९ जानेवारी रोजी बेंगळुरूत होईल. सर्वाधिक शतके करणारे खेळाडू १) सचिन तेंडुलकर- (वनडे-४९, कसोटी-५१) २) रिकी पॉन्टिंग- (वनडे-३०, कसोटी-४१) ३) विराट कोहली- (वनडे-४३, कसोटी-२७) ४) जॅक कॅलिस- (वनडे-१७, कसोटी- ४५) ५) कुमार संगकारा- (वनडे-२५, कसोटी-३८) वाचा-
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/37YYFkq
No comments:
Post a Comment