Ads

Thursday, January 23, 2020

क्रिकेटमधील सर्वात दुर्मिळ व्हिडिओ; केला होता विश्वविक्रम!

नवी दिल्ली: क्रिकेटच्या इतिहासात हाताच्या बोटावर मोजण्या इतके खेळाडू आहेत ज्यांनी एका ओव्हरमध्ये सहा षटकार मारले. सध्याच्या पिढीला विचारले तर सर्वांना आठवतो तो भारताचा . पण क्रिकेटच्या इतिहासात एका ओव्हरमध्ये अशी कामगिरी वेस्ट इंडिजचे महान क्रिकेटपटू आणि कर्णधार () यांनी केली होती. गॅरी सोबर्स यांनी ३१ ऑगस्ट १९६८ रोजी एका प्रथम श्रेणी सामन्यात सात षटकार मारण्याचा पराक्रम केला होता. आज प्रथम श्रेणी आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मिळून सहा फलंदाजांनी अशी कामगिरी केली आहे. यात अफगाणिस्तानचा हजरातुल्ला जजई (२०१८), लिओ कार्ट (२०१८) अॅलेक्स हेल्स (२०१५), हर्शल गिब्स आणि युवराज सिंग (२००७), (१९९५) आणि गॅरी सोबर्स (१९६८) यांचा समावेश आहे. २००७मध्ये झालेल्या टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात युवराजने स्टुअर्ट ब्रॉड याच्या एका ओव्हरमध्ये सहा षटकार मारले होते. युवराजचे ते सहा षटकार आजच देखील चाहते पुन्हा पुन्हा पाहत असतात. वाचा- गॅरी सोबर्स यांनी हिटिंग नॉटिंघमशायरकडून कर्णधार म्हणून ग्लोमॉर्गनविरुद्ध सहा षटकार मारले होते. सोबर्स यांनी मॅल्कम नॅशच्या एकाच ओव्हरमध्ये सहा षटकार मारले. सोबर्स यांच्या कामगिरीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. १० जानेवारी १९८५ रोजी रवी शास्त्री यांनी एकाच ओव्हरमध्ये सहा सिक्स मारले होते. रवी शास्त्री यांनी रणजी ट्रॉफी स्पर्धेत बडोदराचा गोलंदाज तिलक राज याच्या एकाच षटकात सहा सिक्स मारले होते. या सामन्यात रवी शास्त्रींनी १२३ चेंडूत द्विशतक झळकावले होते. तेव्हा शास्त्रींचे द्विशतक सर्वात जलद द्विशतक ठरले होते. या खेळीत त्यांनी १३ चौकार आणि १३ षटकार मारले होते. वाचा- शास्त्रींनी मारलेल्या सहा षटकारानंतर २००७मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या हर्शल गिब्सने आणि युवराज सिंगने आफ्रिकेत झालेल्या टी-२० वर्ल्ड कपमध्ये अशी कामगिरी केली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अशी कामगिरी सर्व प्रथम गिब्सने केली. त्यानंतर आठ वर्षांनी २०१५मध्ये इंग्लंडच्या अॅलेक्स हेल्सने काऊंटी क्रिकेटमध्ये एकाच षटकात सहा सिक्स मारले. वाचा- २०१८मध्ये अफगाणिस्तानच्या हजरातुल्ला जजईने अफगाणिस्तान प्रीमिअर लीग स्पर्धेत सहा चेंडूत सहा षटकार मारले. त्यानंतर पाच जानेवारी न्यूझीलंडच्या लिओ कार्टने सुपर स्मॅश स्पर्धेत एकाच षटकात सहा सिक्स मारण्याचा पराक्रम केला.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2Rn1lmC

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...