Ads

Wednesday, January 22, 2020

सर्फ 'राज': १०२ डिग्री ताप असताना झळकावले त्रिशतक!

मुंबई: रणजी ट्रॉफीतील उत्तर प्रदेशविरुद्धच्या सामन्यात मुंबईच्या याने त्रिशतक झळकावले. सर्फराज याने भारताचा माजी धडाकेबाज फलंदाज विरेंद्र सेहवाग स्टाइलने त्रिशतक पूर्ण केले. सर्फराजच्या या खेळीने सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे. त्याच्या या खेळीबद्दल आता एक नवी माहिती समोर आली आहे. उत्तर प्रदेशविरुद्ध फलंदाजीला उतरण्याच्या एक दिवस आधी सर्फराज याला १०२ डिग्री इतका ताप होता. दोन-तीन दिवसांपासून माझी तब्येत खराब होती. पण संघासाठी मैदानात उतरणे गरजेचे होते. एका बाजूने मी विकेट न टाकता फलंदाजी केली तर सामन्याचा निकाल मुंबईच्या बाजूने लागू शकते याची कल्पना होती. दुसऱ्या दिवसाच्या तुलनेत तिसऱ्या दिवशी तब्येत थोडी ठिक होती. पण उपहारानंतर पुन्हा ताप आला. पण मी फलंदाजी करण्याचे ठरवले, असे सर्फराजने सांगितले. वाचा- त्रिशतक पूर्ण केल्यानंतर सर्फराज म्हणाला, शेजारीच आझाद मैदान आहे. त्या मैदानावर मी आतापर्यंत खेळलो. जेव्हा जेव्हा मी वानखेडे स्टेडियम पाहायचो तेव्हा एक दिवस या मैदानावर प्रेक्षकांनी माझ्यासाठी टाळ्या वाजवाव्यात अशी इच्छा होती. पण तेव्हा मला असे कधीच वाटले नाही की मी त्रिशतक करेन. वाचा- प्रथम श्रेणी सामन्यात सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करताना त्रिशतक झळकावण्याची ही तिसरी वेळ आहे. रणजी ट्रॉफीच्या इतिहासात करुण नायर याने सहाव्या क्रमांकावर त्रिशतक झळकावण्याची कामगिरी केली होती. सर्फराजच्या आधी मुंबईकडून अखेरचे त्रिशतक रोहित शर्माने (३०९ धावा) २००९मध्ये केले होते. २९ वर्षानंतर त्रिशतक स्पर्धेत त्रिशतक करणारा सर्फराज मुंबईचा आठवा फलंदाज आहे. सर्फराजने वानखेडे मैदानावर नाबाद ३०१ धावा केल्या. या मैदानावर १९९१ नंतर प्रथमच मुंबईच्या खेळाडूने त्रिशतक झळकावण्याचा पराक्रम केला. सर्फराजच्या आधी संजय मांजरेकर याने कर्णधार असताना हैदराबादविरुद्ध ३७७ धावा केल्या होत्या. वाचा- चार दिवसांच्या प्रथम श्रेणी कसोटी सामन्यात प्रतिस्पर्धी संघाने ६००हून अधिक धावा केल्यानंतर आघाडी घेण्याची दुर्मीळ घटना मुंबई-उत्तर प्रदेश यांच्यात झालेल्या सामन्यात झाली. उत्तर प्रदेशने पहिल्या डावात ८ बाद ६२५ धावा केल्या. त्यानंतर मुंबईने पहिल्या डावात ६८८ धावा केल्या. सेहवाग स्टाइलने २५० आणि ३००० सर्फराजने ६३३ मिनिटे फलंदाजी करत करिअरमधील पहिले त्रिशतक झळकावले. यामुळे मुंबई संघाला ३ गुण मिळाले. सर्फराजच्या या खेळीतील खास वैशिष्ट म्हणजे त्याने २५० आणि ३०० धावा षटकार मारून पूर्ण केल्या. भारताचा स्फोटक फलंदाज विरेंद्र सेहवाग देखील अशाच प्रकारे फलंदाजी करायचा.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/38ytMni

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...