मुंबईः न्यूझीलंडविरुद्ध खेळवल्या जाणाऱ्या टी-२० मालिकेसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने () भारतीय क्रिकेट संघाची घोषणा केली आहे. जानेवारी महिन्याच्या अखेरीस न्यूझीलंड दौऱ्यावर जाणार आहे. नववर्षातील पहिल्या परदेश दौऱ्यासाठी बीसीसीआयने भारतीय संघ जाहीर केला. न्यूझीलंड दौऱ्यावर असताना भारतीय संघ पाच सामन्यांची टी-२० मालिका, तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका आणि दोन कसोटी सामने खेळणार आहे. यामधील टी-२० मालिकेसाठी रविवारी रात्री उशिरा बीसीसीआयने भारतीय संघ जाहीर केला. आताच्याघडीला फॉर्मात असलेल्या सलामीवीर रोहित शर्माने संघात पुनरागमन केले आहे. यष्टीरक्षक संजू सॅमसन आणि अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याला या मालिकेसाठी संघात स्थान मिळवता आले नाही. हार्दिक पंड्या दुखापतग्रस्त असल्यामुळे त्याला संघात स्थान देण्यात आलेले नाही. टी-२० मालिकेसाठी कर्णधारपद विराट कोहलीकडेच असून, उपकर्णधार असेल. यष्टीरक्षणाची जबाबदारी ऋषभ पंतच्या खांद्यावर देण्यात आली आहे. दरम्यान, एकदिवसीय सामने आणि कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही. टी-२० मालिकेसाठीचा भारतीय संघः विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), लोकेश राहुल, शिखर धवन, श्रेयस अय्यर, मनिष पांडे, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), शिवम दुबे, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, रविंद्र जाडेजा व शार्दुल ठाकूर.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/36OaCcD
No comments:
Post a Comment