नवी दिल्ली: न्यूझीलंड दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा रविवारी करण्यात आली. भारतीय संघ सहा आठवड्यांसाठी न्यूझीलंड दौऱ्यावर जात असून यात दौऱ्यात ५ टी-२०, तीन वनडे आणि दोन कसोटी सामने होणार आहेत. सलामीवीर रोहित शर्माने संघात पुनरागमन केले आहे. यष्टीरक्षक संजू सॅमसन आणि अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याला या मालिकेसाठी संघात स्थान मिळवता आले नाही. हार्दिक पंड्या दुखापतग्रस्त असल्यामुळे त्याला संघात स्थान देण्यात आलेले नाही. टी-२० मालिकेसाठी कर्णधारपद विराट कोहलीकडेच असून, रोहित शर्मा उपकर्णधार असेल. यष्टीरक्षणाची जबाबदारी ऋषभ पंतच्या खांद्यावर देण्यात आली आहे. दरम्यान, एकदिवसीय सामने आणि कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही. वाचा- टी-२० मालिकेसाठीचा भारतीय संघः विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), लोकेश राहुल, शिखर धवन, श्रेयस अय्यर, मनिष पांडे, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), शिवम दुबे, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, रविंद्र जाडेजा व शार्दुल ठाकूर. असा आहे भारतीय संघाचा न्यूझीलंड दौरा >> टी-२० मालिका पहिली टी-२० : ऑकलंड- २४ जानेवारी २०२० दुसरी टी-२०: ऑकलंड- २६ जानेवारी २०२० तिसरी टी-२०: हॅमिल्टन- २९ जानेवारी २०२० चौथी टी-२०: वेलिंग्टन- ३१ जानेवारी २०२० पाचवी टी-२०: माऊंट माउंगानुई- ०२ फेब्रुवारी २०२० वाचा- >> वनडे मालिका पहिली वनडे: हॅमिल्टन- ०५ फेब्रुवारी २०२० दुसरी वनडे: ऑकलंड-०८ फेब्रुवारी २०२० तिसरी वनडे : माऊंट माउंगानुई- ११ फेब्रुवारी २०२० न्यूझीलंड अ संघाविरुद्ध ३ दिवसाचा सराव सामना: हॅमिल्टन- १४ ते १६ फेब्रुवारी >> कसोटी मालिका पहिली कसोटी: २१ ते २५ फेब्रुवारी- वेलिंग्टन दुसरी कसोटी: २९ फेब्रुवारी ते ०४ मार्च- ख्राइस्टचर्च
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2TkA4Cu
No comments:
Post a Comment