मुंबई: महान फलंदाज आणि माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीचे गुरू यांचा आज प्रथम स्मृतीदिन असून, सचिन आणि कांबळी हे दोघेही आज भावूक झाले. या दोघांनी ट्विटद्वारे आपल्या गुरूला श्रद्धांजली वाहिली आहे. 'तुमच्या आठवणी आमच्या मनात सदैव राहतील, आचरेकर सर!' असं सचिननं म्हटलं आहे. तर मला तुमची उणीव नेहमीच भासेल, असं ट्विट कांबळीनं केलं आहे. सचिननं ट्विटमध्ये आचरेकर यांच्यासोबतचा एक जुना फोटो शेअर केला आहे. 'तुमच्या आठवणी आमच्या मनात सदैव राहतील, आचरेकर सर' असं त्यात म्हटलं आहे. सचिननं ही पोस्ट इंस्टाग्रामवरही पोस्ट केली आहे. गेल्या वर्षी जेव्हा आचरेकर यांचे मुंबईमध्ये निधन झालं होतं, त्यावेळीही सचिननं त्यांच्याविषयी भावूक प्रतिक्रिया दिली होती. 'आचरेकर सरांच्या उपस्थितीत स्वर्गातही क्रिकेट समृद्ध होईल. अन्य विद्यार्थ्यांसह मी सुद्धा क्रिकेटची एबीसीडी सरांच्या मार्गदर्शनाखाली शिकलो. माझ्या आयुष्यातील त्यांचे योगदान शब्दांत व्यक्त करता येऊ शकत नाही,' असं ट्विट त्यानं केलं होतं. माजी क्रिकेटपटू यानंही आचरेकर यांना श्रद्धांजली वाहिली आहे. 'कोणताही मार्गदर्शक तुमच्या इतका अमूल्य असू शकत नाही. तुम्ही मला केवळ क्रिकेट खेळायला शिकवलं नाहीत, तर वास्तवातील जीवनाचे धडेही तुम्ही मला दिलेत. मला तुमची कायम उणीव भासेल, आचरेकर सर!' असं कांबळी म्हणाला. त्यानंही आचरेकर सरांसोबतचा फोटो शेअर केला आहे. आचरेकर यांना उल्लेखनीय योगदानासाठी २०१० साली पद्मश्री आणि १९९०मध्ये द्रोणाचार्य पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं. सचिन तेंडुलकर, विनोद कांबळीसह प्रवीण आमरे, समीर दीघे, चंद्रकांत पंडित, बलविंदर सिंह संधू आदी आचरेकर सर यांचे शिष्य आहेत.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/39zTk4u
No comments:
Post a Comment