मोहाली: पंचाच्या निर्णयावर खेळाडूंनी नाराजी व्यक्त करण्याचे प्रसंग क्रिकेटच्या मैदानावर अनेकदा घडले आहेत. मात्र, रणजी ट्रॉफीतील एका सामन्यात नुकताच घडलेला एक किस्सा विरळाच म्हणावा लागेल. फलंदाज संतापल्यानं दिलेला निर्णय पंचांनी स्वत:च बदलण्याची घटना मोहालीत घडली आहे. दिल्ली विरुद्ध पंजाबच्या सामन्यात हा प्रसंग घडला. भारतीय क्रिकेटमधील सध्याचा उगवता तारा असलेला पंजाबकडून खेळत होता. दहा धावांवर खेळत असताना भारतीय 'अ' संघाचा कर्णधार सुबोध भाटी यांच्या एका चेंडूवर यष्टीरक्षकानं त्याचा झेल घेतला. पंच मोहम्मद रफी यांनी तात्काळ बाद असा निर्णय दिला. या निर्णयावर शुभमन भडकला. त्यानं खेळपट्टी सोडण्यास नकार दिला. तो पंचांकडं गेला आणि त्यांच्याशी वाद घालू लागला. पंचांनी निर्णय बदलावा, असा दबाव तो टाकू लागला. त्यामुळं खेळ थांबवावा लागला. वाचा: रफी यांनी दुसरे पंच पश्चिम पाठक यांच्याशी सल्लामसलत केली. त्यानंतर रफी यांनी स्वत:चा निर्णय बदलून शुभमनला नाबाद घोषित केले. मात्र, नाबाद दिल्यानंतर शुभमन फार काळ खेळपट्टीवर टिकला नाही. ४१ चेंडूत २३ धावा काढून तो समरजित सिंहच्या चेंडूवर बाद झाला. पंचांनी निर्णय बदलल्यानंतर दिल्लीचा यष्टीरक्षक नीतीश राणा यानं पंचांशी चर्चा केली. मात्र, सामनाधिकाऱ्यांच्या मध्यस्थीनंतर खेळ पुन्हा सुरू झाला, असं दिल्ली संघाचे व्यवस्थापक विवेक खुराणा यांनी सांगितले. वाचा:
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/36mGqoL
No comments:
Post a Comment