नवी दिल्ली: टीम इंडियाचा कर्णधार सध्या जगातला अव्वल फलंदाज आहे. अवघं क्रिकेटविश्व त्याला रनमशीन म्हणून ओळखतं. क्रिकेट कारकिर्दीच्या सुरुवातीला त्यालाही अनेक वेळा संधी देण्यात आली होती. त्यामुळंच तो आज टीम इंडियाचा 'कणा' आहे. माजी क्रिकेटपटू आणि निवड समितीचे माजी अध्यक्ष यांनी याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही विराटला वारंवार संधी दिली, त्यामुळंच त्याचा आज दबदबा आहे, असं श्रीकांत म्हणाला. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली फार्मात आहे. त्याचा हा खेळ असाच राहिला तर विक्रमांच्या राशी तो रचेल, यात शंकाच नाही. सध्याचा आघाडीचा फलंदाज म्हणून त्याची ओळख आहे. आगामी काळात तो शतकांच्या बाबतीत महान फलंदाज सचिन तेंडुलकर याचाही विक्रम मोडणार असल्याचं बोललं जात आहे. रनमशीन असलेला विराट कोहली यशोशिखरावर पोहोचला आहे. त्याच्या यशाबाबत माजी क्रिकेटपटू आणि निवड समितीचे माजी प्रमुख श्रीकांत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही विराटला सुरुवातीच्या काळात वारंवार संधी दिली. त्यामुळंच तो आज क्रिकेटवर अधिराज्य गाजवत आहे. मी आपल्याला आठवण करून देऊ इच्छितो, आम्ही विराटला संघाकडून खेळण्याची वारंवार संधी दिली. त्यामुळं तो आज कुठपर्यंत पोहोचला आहे. त्याला या ठिकाणी पाहून खूपच चांगलं वाटत आहे, असे श्रीकांत म्हणाले. कोहलीनं स्वतःला एक खेळाडू म्हणून वारंवार सिद्ध केलं आहे. आज तो क्रिकेटविश्वावर अधिराज्य गाजवत आहे. विराटनं भारतीय संघाकडून खेळताना सातत्यानं धावा केल्या आहेत, असंही ते म्हणाले. २०११सालच्या विश्वकपविषयीही त्यांनी आपली मतं मांडली. मी २००८साली निवड समितीच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली. २०११ सालचं विश्वकप जिंकणारा संघ तयार करण्याचं माझं स्वप्न होतं. देव दयाळू आहे. आमच्याकडे धोनीसारखा कर्णधार होता. तो विजय माझ्या क्रिकेट कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट क्षणांपैकी एक आहे. निवडकर्त्यांना त्याचं श्रेय दिलं जात नाही, असं श्रीकांत म्हणाले.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2FbPcdl
No comments:
Post a Comment