मुंबई: टीम टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याने आपल्या नात्याची जाहीर कबुली दिली आहे. लवकरच तो विवाह बंधनात अडकणार असून त्याचा साखरपुडा पार पडला आहे. हार्दिक सर्बियन मॉडेल अभिनेत्री नताशा स्टॅन्कोविकसोबत विवाह बंधनात अडकणार आहे. हार्दिकने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर दोन फोटो पोस्ट करून ही माहिती दिली आहे. एका फोटोत नताशा आपली साखरपुड्याची अंगठी दाखवत आहे. तर, दुसऱ्या फोटोत हे जोडपं एका चीअर मोमेंटमध्ये दिसत आहे. हार्दिकने नताशासोबतच्या फोटोला 'मै तेरा, तू मेरी जाने, सारा हिंदुस्थान' अशी कॅप्शन देत नात्याची जगजाहीर कबुली दिली. हार्दिकने नताशा स्टॅन्कोविकसोबतचा एक फोटो शेअर करत म्हटले की, 'वर्षाची सुरुवात एका फटाक्याने करत आहे'. त्यानंतर हार्दिकने काही तासांनंतर आपल्या साखरपुड्याचा फोटो शेअर केला. एका जहाजावर हार्दिकने आपला साखरपुडा केला. तर, नताशानेदेखील एक रोमॅंटिक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत हार्दिक नताशाला फिल्मी स्टाइलमध्ये प्रपोज करताना दिसत आहे. गुडघ्यावर बसून हार्दिकने रोमँटिकपणे तिला लग्नासाठी विचारणा केली. त्याला नताशाने होकार दिला.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2FaaUOT
No comments:
Post a Comment