केपटाऊन: भारतीय क्रिकेटपटू रोहित शर्मा, कर्णधार विराट कोहली यांच्यासाठी २०१९ हे वर्ष प्रचंड यश देणारे ठरले. इंग्लंडचा अष्टपैलू बेन स्टोक्ससाठी ()देखील २०१९ वर्ष शानदार होते. फलंदाजी, गोलंदाज आणि क्षेत्ररक्षण या तीनहीमध्ये स्टोक्सने कमाल केली. इंग्लंडला पहिले आयसीसी वर्ल्ड कप विजेतेपद मिळवून देण्यात स्टोक्सचा मोठा हात होता. त्याच बरोबर अॅशेस मालिका बरोबरीत सोडवण्यासाठी त्याची शतकी खेळी महत्त्वाची ठरली होती. अन्य क्रिकेटपटूंना हेवा वाटेल असे यश स्टोक्सने मिळवले खरे, पण त्याला आता हे काहीही नको आहे. उलट जे यश मिळाले ते परत घेतले तरी चालेल, असे स्टोक्स म्हणतोय. वाचा- इंग्लंडचा संघ सध्या दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर आहे. हा दौरा सुरु असतानाच स्टोक्सच्या वडिलांना रुग्णालयात दाखल करावे लागले. बेनचे वडील गेड स्टोक्स गेल्या काही दिवसांपासून जोहान्सबर्ग येथील रुग्णालयात उपचार घेत आहेत. गेड मुलाची मॅच पाहण्यासाठी जोहान्सबर्गला आले होते, पण त्यांची प्रकृती बिघडली आणि त्यांना २३ डिसेंबर रोजी रुग्णालयात दाखल केले. वडील रुग्णालयात दाखल झाल्यामुळे पहिला कसोटी सामना खेळू शकला नाही. आता वडिलांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यामुळे तो पुन्हा दुसरी टेस्ट मॅच खेळण्यासाठी केपटाऊनला गेला आहे. वाचा- दुसऱ्या टेस्ट मॅच आधी 'डेली मिरर'शी बोलताना स्टोक्स म्हणाला, २०१९ वर्ष माझ्यासाठी सर्वात यश देणारे ठरले. पण तेच वर्ष आता मला त्रास देणारे ठरत आहे. क्रिकेटमध्ये मी चांगली कामगिरी केली असली तरी आता माझे वडील रुग्णालयात आहेत. जर मला कोणी २०१९मध्ये मिळवलेल्या यशाच्या बदल्यात वडिलांची प्रकृती बरी करून देणार असल्याचे सांगितले तर मी माझे सर्व यश त्याला देण्यास तयार आहे, असे भावुक होऊन स्टोक्स म्हणाला. आफ्रिकेचा दौरा ठरला वाईट बेन स्टोक्सने दक्षिण आफ्रिकेचा दौरा संघासाठी वाईट ठरल्याचे म्हटले आहे. आफ्रिकेत गेल्यापासून कोणतीही गोष्ट आमच्यासाठी चांगली झाली नाही. संघातील खेळाडू आजारी पडलेत. खराब कामगिरीसाठीचे हे कारण नाही. पण जर तुम्ही निट जेवला नाही, झोपला नाही तर मानसिक आणि शारीरिक अडचणी सुरू होतात, असे तो म्हणाला. वाचा- इंग्लंडचा आफ्रिकेचा दौरा सुरू झाल्यापासून आतापर्यंत अकरा खेळाडूंची तब्येत बिघडली आहे. डोम सिबले, जो डेनली, जो रुट, ऑली पोप, बेन स्टोक्स, जोस बटलर, ख्रिस वोक्स, जॅक लीच, जोफ्रा आर्चर, स्टुअर्ट ब्रॉड आणि मार्क वुड हे खेळाडू आफ्रिका दौऱ्यात आजारी पडले आहेत. इंग्लंडला दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा बॉक्सिंग डे सामन्यात पराभव पत्करावा लागला होता.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2sG9k4z
No comments:
Post a Comment