Ads

Wednesday, February 24, 2021

मोटेराला मोदींचे नाव; नेहरूंच्या नावाने ९ तर इंदिरा गांधींच्या नावाने ३ स्टेडियम

अहमदाबाद: मोटेरा या जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियमचे नाव बदलून ( ) केल्याने सोशल मीडिवर दोन गट पडले आहेत. अनेकांनी याला विरोध केला आहे. तर भाजपचे नेते आणि समर्थक त्याला पाठिंबा देत आहेत. वाचा- गुजरात क्रिकेट असोसिएशनने घेतलेल्या या निर्णयावर अनेक जण आक्षेप घेत आहेत. अनेकांनी तर सरदार पटेल यांचे नाव बदलल्यावरून भाजपवर टीका केली आहे. पण सरदार वल्लभभाई पटेल स्पोर्ट्स कॉम्पलेक्स या ६३ एकर परिसरात पसरलेल्या कॉम्पलेक्समधील मोरेटा या क्रिकेट मैदानाचे नाव नरेंद्र मोदी असे करण्यात आले. वाचा- मोदीचे नाव स्टेडियमला देण्यावरून विरोध प्रामुख्याने काँग्रेसचे नेते आणि समर्थक आहेत. पण देशातील एखाद्या स्टेडियमला राजकीय नेत्याचे किंवा पंतप्रधानांचे नाव देण्याची ही पहिली वेळ नाही. देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या नावाने ९ स्टेडियम आहेत. ही स्टेडियम नवी दिल्ली, कोच्ची, चेन्नई, इंदूर, गुवाहाटी, मडगाव, पुणे आणि गाझियाबाद येथे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. तर इंदिरा गांधी यांच्या नावाने गुवाहाटी, नवी दिल्ली, विजयवाडा येथे राजीव गांधी यांच्या नावाने हैदराबाद, डेहराडून, कोच्ची आणि विशाखापट्टनम येथे स्टेडियम आहेत. फुटबॉल, क्रिकेट, कुस्ती, कबड्डी अशा अनेक खेळाची ही स्टेडियम आहेत. वाचा- माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावाने हिमाचल प्रदेशमधील नादोन येथे क्रिकेट स्टेडियम आहे. देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभ भाई पटेल यांच्या नावाने वलसाड येथे आणि अहमदाबाद येथे स्टोटर्स कॉम्पेक्स आहे. दिल्लीतील कोटला स्टेडियमचे नाव बदलून अरुण जेटली असे केले गेले. केरळमधील कोईकोड येथील मैदानाचे नाव राज्याचे पहिले मुख्यमंत्री ईएमएस नंबूद्रिपाद असे केले गेले आहे. वाचा- प्रशासकांची नावे स्टेडियमला फक्त राजकीय नेत्यांची नावे नाही तर क्रीडा क्षेत्रातील प्रशासकांची देखील नावे स्टेडियमला देण्यात आली आहेत. यात चेन्नईचे एमए चिदंबरम स्टेडियम, मोहालीचे आयएस बिंद्रा, मुंबईचे वानखेडे, बेंगळुरूचे एम चिन्नास्वामी ही त्याची उदाहरणे आहेत. याशिवाय प्रसिद्ध गायक भूपेन हजारिका याचे नाव एका मैदानाला दिले आहे. तर दिल्लीतील संगीतकार त्यागराजा यांच्या नावाने स्टेडियम आहे. इंग्रजी नावे असलेली मैदाने मुंबईत ब्रेबोर्न स्टेडियम हे नाव गव्हर्नर लॉर्ड ब्रेबोर्न यांच्या नावाने दिले आहे. तर कोलकातामधील इडन गार्डन्स हे नाव भारताचे माजी गव्हर्नर जनरल लॉर्ड ऑकलँड यांची बहिणी एमिली आणि फेनी इडन यांच्या नावाने दिले आहे. जमशेदपूर येथील कीनन स्टेडियम हे टाटा स्टीलचे माजी जनरल मॅनेजर जॉन लॉरेंस कीनन यांच्या नावाने ठेवले आहे. या क्रिकेटपटूंच्या नावने स्टॅड आहे पण स्टेडियम नाही सचिन तेंडुलकर, सुनील गावस्कर, कपिल देव यांच्या नावाने दिल्ली, मुंबईसह अनेक स्टेडियमवर स्टॅड आहेत. हॉकीत देखील अशा प्रकारे खेळाडूंची नावे देण्यात आली आहेत. इंदूरमध्ये एका स्टेडियमला महाराणी उषाराजे ट्रस्ट क्रिकेट ग्राउड आहे. तेथे आधी होळकर क्रिकेट टीम देखील होती. २०१० साली त्याचे नाव होळकर स्टेडियम असे केले.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2ZIIANE

IND vs ENG : बेन स्टोक्सने पहिल्याच दिवशी नियम मोडला, पंचांनी केलं हे काम...

अहमदाबाद, : तिसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्याच दिवशी इंग्लंडचा क्रिकेटपटू बेन स्टोक्सने नियम मोडल्याचे पाहायला मिळाले. भारतीय संघ फलंदाजी करत असताना १२व्या षटकात ही गोष्ट पाहायला मिळाली. भारतीय संघाला पहिला धक्का बसला. नेमकं घडलं तरी काय, पाहा...इंग्लंडचा वेगवान गोलंदाज ख्रिस ब्रॉडने यावेळी १२वे षटक टाकले. त्यानंतर १३वे षटक टाकण्यासाठी थोडा वेळ होता. त्यावेळी बेन स्टोक्सच्या हातामध्ये चेंडू होता. त्यावेळी स्टोक्सने चेंडू हातात घेत त्याला लाळ लावली. करोनानंतर आयसीसीने कडक नियम बनवले आहे. स्टोक्सने यावेळी या नियमांचा भंग केला. पंचांनी यावेळी स्टोक्सशी लगेचच संवाद साधला. पंचांनी स्टोक्सला ताकिद दिल्याचे म्हटले गेले, पण पंचांनी ताकिद दिली की नाही, याबाबत अधिकृत माहिती आलेली नाही. करोनानंतर नवीन नियम आहे तरी काय, पाहा...करोनानंतर क्रिकेटमध्ये आयसीसीने काही नवीन नियम केले आहेत. करोनानंतर जर कोणत्याही खेळाडूने चेंडूला लाळ किंवा थुंकी लावण्याचा प्रयत्न केला, तर तो नियमाचा भंग ठरेल. यावेळी पंच पहिल्यांदा या खेळाडूवा ताकिद देतील. पंचांना ताकिद दिल्यानंतरतही जर त्या खेळाडूने पुन्हा तीच गोष्ट केली तर संघाच्या पाच धावा कमी करण्यात येऊ शकतात. त्यामुळे आयसीसीच्या या नियमांचे पालन सर्वांनाच करावे लागणार आहे. इंग्लंडला यावेळी प्रथम फलंदाजी करताना फक्त ११२ धावाच करता आल्या. इशांत शर्माने तिसऱ्याच ओव्हरमध्ये इंग्लंडला पहिला धक्का दिला. त्याने डॉमनिक सिबलीला शून्यावर बाद केले. त्यानंतर जॉनी बेयरस्टोला अक्षरने शून्यावर बाद करून इंग्लंडची अवस्था २ बाद २७ केली. बेयरस्टो बाद झाल्यानंतर मैदानावर आलेल्या जो रूटने क्रॉली सोबत ४७ धावांची भागिदारी केली. ही जोडी इंग्लंडला सावरेल असे वाटत असताना अश्विनने रुटची विकेट घेतली. त्यानंतर पहिले सत्र संपल्याआधी अक्षरने क्रॉलीला ५३ धावांवर बाद केले. दुसऱ्या सत्रात इंग्लंडची आणखी वाइट अवस्था झाली. ८१ धावांवर त्यांच्या दोन विकेट पडल्या. ओली पोपला अश्विनने तर अक्षरने बेन स्टोक्सला बाद केले. भारतीय गोलंदाजांनी इंग्लंडच्या तळातील फलंदाजांना मोठी धावसंख्या उभी करू दिली नाही. जोफ्रा आर्चरला अक्षरने, जॅक लीचला अश्विनने बाद केले आणि पाहूण्यांची अवस्था ८ बाद ९८ अशी केली. अखेर च्या दोन फलंदाजांना झटपट बाद करून भारताने इंग्लंडला फक्त ११२ धावांवर रोखले. भारताकडून अक्षर पटेलने सलग दुसऱ्या कसोटीत पाच विकेट घेतल्या. त्याने ३८ धावात ६ विकेट घेतल्या. तर आर अश्विनने २६ धावात ३ विकेट घेतल्या.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3qQhcJJ

IND vs ENG : भारतातील सर्वाधिक क्रिकेट चाहते गुजरातमध्येच आहेत, सुनील गावस्कर यांचं वादग्रस्त विधान

अहमदाबाद, : गुजरातमध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना रंगत आहे. यावेळी समालोचन करत असताना भारताचे माजी कर्णधार आणि समालोचक सुनील गावस्कर यांनी एक विधान केलं आहे. गावस्कर यांनी म्हटले होते की, " भारतामधील सर्वाधिक क्रिकेट चाहते हे गुजरातमध्ये आहेत." गावस्कर यांच्या या विधानानंतर वाद व्हायला सुरुवात झाली आहे. यावेळी गावस्कर म्हणाले की, " भारतामध्ये सर्वाधिक क्रिकेटचे चाहते हे गुजरातमध्ये आहे. पश्चिम बंगालमध्येही चाहते आहेत, पण तिथे जास्त फुटबॉलचे चाहते आहेत. मुंबईमध्ये विविध खेळ खेळले जातात, त्यामुळे तिथे चाहते विभागलेले पाहायला मिळतात. उत्तर भारतामध्ये हॉकीचे वेड जास्त आहे. पण गुजरातमध्ये क्रिकेटशिवाय अन्य कोणता खेळत जास्त दिसत नाही. त्यामुळेच गुजरातमधल्या लोकांसाठी क्रिकेट हे सर्व काही आहे आणि या गोष्टीचा अनुभव सामना पाहताना येत आहे." इंग्लंडचा कर्णधार जो रूटने टॉस जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या खेळपट्टीवर मोठी धावसंख्या उभी करता येईल अशी इंग्लंडचा हेतू होता. पण १००वी कसोटी खेळणाऱ्या इशांत शर्माने तिसऱ्याच ओव्हरमध्ये इंग्लंडला पहिला धक्का दिला. त्याने डॉमनिक सिबलीला शून्यावर बाद केले. त्यानंतर जॉनी बेयरस्टोला अक्षरने शून्यावर बाद करून इंग्लंडची अवस्था २ बाद २७ केली. बेयरस्टो बाद झाल्यानंतर मैदानावर आलेल्या जो रूटने क्रॉली सोबत ४७ धावांची भागिदारी केली. ही जोडी इंग्लंडला सावरेल असे वाटत असताना अश्विनने रुटची विकेट घेतली. त्यानंतर पहिले सत्र संपल्याआधी अक्षरने क्रॉलीला ५३ धावांवर बाद केले. दुसऱ्या सत्रात इंग्लंडची आणखी वाइट अवस्था झाली. ८१ धावांवर त्यांच्या दोन विकेट पडल्या. ओली पोपला अश्विनने तर अक्षरने बेन स्टोक्सला बाद केले. भारतीय गोलंदाजांनी इंग्लंडच्या तळातील फलंदाजांना मोठी धावसंख्या उभी करू दिली नाही. जोफ्रा आर्चरला अक्षरने, जॅक लीचला अश्विनने बाद केले आणि पाहूण्यांची अवस्था ८ बाद ९८ अशी केली. अखेर च्या दोन फलंदाजांना झटपट बाद करून भारताने इंग्लंडला फक्त ११२ धावांवर रोखले. भारताकडून अक्षर पटेलने सलग दुसऱ्या कसोटीत पाच विकेट घेतल्या. त्याने ३८ धावात ६ विकेट घेतल्या. तर आर अश्विनने २६ धावात ३ विकेट घेतल्या.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2MlP2ap

IND vs ENG: 'या' खेळाडूने द्विशतक करावे आणि विजय मिळवून द्यावा- अमित शहा

अहमदाबाद: भारत आणि इंग्लंड यांच्यात मोटेरा स्टेडियम ( नवे नाव- नरेंद्र मोदी स्टेडियम) तिसरा कसोटी सामना सुरू आहे. डे-नाइट या सामन्याच्या आधी स्टेडियमचा उद्घाटन सोहळा पार पडला. या कार्यक्रमात राष्ट्रपती रामनाथ कोविंद, केंद्रीय गृहमंत्री ( ) आणि गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत होते. वाचा- मोटेरा स्टेडियमचे नाव नरेंद्र मोदी स्टेडियम असे करण्यात आल्यानंतर बोलताना अमित शहा म्हणाले, हे मैदान जवागल श्रीनाथ यांच्यासाठी खास आहे. ते या सामन्यात मॅच रेफरी आहेत. त्यांनी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मोटेरा मैदानावर ६ विकेट घेतल्या होत्या आणि विजय मिळवून दिला होता. कपिल देव यांनी रिचर्ड हेडली यांच्या सर्वाधिक विकेटचा विक्रम याच मैदानावर मोडला होता. तर सुनिल गावस्कर यांनी कसोटीत १० हजार धावा येथेच केल्या होत्या. वाचा- या मैदानावर आजपासून सुरू होणाऱ्या सामन्यात भारताचा स्टार फलंदाज ( )ने द्विशतक करावे आणि इंग्लंडविरुद्ध भारताला विजय मिळून द्यावा अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली. वाचा- पुजाराने जेव्हा इंग्लंडविरुद्ध अहमदाबाद येथे अखेरची कसोटी खेळली होती तेव्हा त्याने द्विशतक केले होते. अमित शहांनी पुन्हा तशी कामगिरी करावी अशा शुभेच्छा दिल्या. गेल्या काही काळात पुजाराने शतक झळकावले नाही. असे असेल तरी त्याने अनेक महत्त्वाच्या क्षणी संघाचा डाव सावरला आणि सामना जिंकून किंवा ड्रॉ करून दिला.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2ZLQdTA

IND vs ENG Pink Ball Test: अक्षर पटेलचा डबल धमाका, इंग्लंडच्या पहिल्या डावात फक्त ११२ धावा

अहमदाबाद: इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात भारतीय गोलंदाजांनी पहिल्या दिवशी शानदार गोलंदाजी केली. पाहूण्या संघाने या डे-नाइट सामन्यात टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला खरा, पण हा निर्णय त्यांच्या अंगलट आला. पहिल्या डावात त्यांना फक्त ११२ धावा करता आल्या. भारताकडून अक्षर पटेलने सर्वाधिक ६ विकेट घेतल्या. वाचा- वाचा- नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुरू असलेल्या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार जो रूटने टॉस जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या खेळपट्टीवर मोठी धावसंख्या उभी करता येईल अशी इंग्लंडचा हेतू होता. पण १००वी कसोटी खेळणाऱ्या इशांत शर्माने तिसऱ्याच ओव्हरमध्ये इंग्लंडला पहिला धक्का दिला. त्याने डॉमनिक सिबलीला शून्यावर बाद केले. त्यानंतर जॉनी बेयरस्टोला अक्षरने शून्यावर बाद करून इंग्लंडची अवस्था २ बाद २७ केली. वाचा- बेयरस्टो बाद झाल्यानंतर मैदानावर आलेल्या जो रूटने क्रॉली सोबत ४७ धावांची भागिदारी केली. ही जोडी इंग्लंडला सावरेल असे वाटत असताना अश्विनने रुटची विकेट घेतली. त्यानंतर पहिले सत्र संपल्याआधी अक्षरने क्रॉलीला ५३ धावांवर बाद केले. दुसऱ्या सत्रात इंग्लंडची आणखी वाइट अवस्था झाली. ८१ धावांवर त्यांच्या दोन विकेट पडल्या. ओली पोपला अश्विनने तर अक्षरने बेन स्टोक्सला बाद केले. वाचा- इंग्लंडच्या तळातील फलंदाजांना भारतीय गोलंदाजांनी फार मोठी धावसंख्या उभी करू दिली नाही. जोफ्रा आर्चरला अक्षरने, जॅक लीचला अश्विनने बाद केले आणि पाहूण्यांची अवस्था ८ बाद ९८ अशी केली. अखेर च्या दोन फलंदाजांना झटपट बाद करून भारताने इंग्लंडला फक्त ११२ धावांवर रोखले. वाचा- भारताकडून अक्षर पटेलने सलग दुसऱ्या कसोटीत पाच विकेट घेतल्या. त्याने ३८ धावात ६ विकेट घेतल्या. तर आर अश्विनने २६ धावात ३ विकेट घेतल्या. १००वी कसोटी खेळणाऱ्या इशांतने १ विकेट घेतली. डे-नाइट कसोटीत एका डावात सर्वाधिक विकेट घेणाऱ्या फिरकीपटूंमध्ये दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. तर इंग्लंडचा भारताविरुद्धचा हा चौथ्या क्रमांकाचा निचांकी स्कोअर आहे. १९७१ साली त्यांचा १०१ हा सर्वात कमी स्कोअर आहे. त्यानंतर मुंबईत ८० साली १०२, लिड्सवर ८६ साली १०२ धावा केल्या होत्या.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3uvzHFc

IND vs ENG : अक्षर पटेलने हा फॉर्म्युला वापरला आणि इंग्लंडला सळो की पळो करुनं सोडलं....

अहमदाबाद, : अक्षर पटेलने आजच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडच्या संघाला सळो की पळो करून सोडलं. कारण अक्षरने यावेळी सहा विकेट्स घेत इंग्लंडच्या फलंदाजीचा कणा मोडला. यावेळी अक्षरने एक फॉर्म्युला वापरत भारतीय संघाला मोठे यश मिळवून दिले. अक्षरची आतापर्यंतची ही सर्वात चांगली कामगिरी ठरली आहे. अहमदाबादच्या या खेळपट्टीवर अक्षरने आपल्या फिरकीच्या तालावर इंग्लंडच्या फलंदाजांना चांगलेच नाचवले. अक्षरने यावेळी फक्त ३६ धावा देत इंग्लंडला सहा धक्के दिले. पण त्याचबरोबर अक्षरच्या गोलंदाजीचा एक फॉर्म्युला यावेळी पाहायला मिळाला. अक्षरने पहिल्यांदा जॉनी बेअरस्टोसारख्या नामांकित फलंदाजाला बाद केले. त्यानंतर अक्षरने बेन स्टोक्सचाही काटा काढला. पण सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे अक्षरने यावेळी इंग्लंडकडून एकमेव अर्धशतक झळकावणाऱ्या झॅक क्राऊलेलाही तंबूचा रस्ता दाखवला. अक्षरने यावेळी एकच फॉर्म्युला यावेळी वापरल्याचे पाहायला मिळाले. अक्षरने यावेळी जे सहा विकेट्स पटकावले, ते पाहिले तर त्याने स्टम्पच्या लाइनमध्येच गोलंदाजी केल्याचे पाहायला मिळाले. अक्षरने यावेळी इंग्लंडच्या खेळाडूंना पायचीत आणि क्लीन बोल्ड केले. त्यावेळी अक्षरने स्टम्पच्या लाईनमध्ये गोलंदाजी केल्याचे पाहायला मिळाले. चेंडू वळत असताना तरी अक्षरने यावेळी स्टम्पच्या लाईनमध्ये चेंडू टाकून हे विकेट्स मिळवल्याचे पाहायला मिळाले. आतापर्यं अक्षरने कसोटी क्रिकेटमध्ये पाच बळी मिळवले होते. पण एकाच डावात सहा विकेट्स मिळवण्याची अक्षरची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे आता दुसऱ्या डावात अक्षर कशी कामगिरी करतो, याकडे सर्वांचे लक्ष असेल. तिसरा कसोटी सामना अहमदाबाद येथे सुरु झाला आहे. या स्टेडियमचे अचानक नामांतर करण्यात आले आणि नरेंद्र मोदी क्रिकेट स्डेटियम, असे नाव देण्यात आले. हे स्टेडियम मोठ्या परिसरामध्ये आहे. संपूर्ण परिसराचे नाव सरदार वल्लभभाई पटेल स्पोर्ट्स कॉम्पलेक्स असे करण्यात आले होते. आता भारत आणि इंग्लंड यांच्यातील डे-नाइट कसोटी सामन्याआधी या कॉम्पलेक्समधील क्रिकेट स्टेडियमचे नाव बदलण्यात आले आहे. मोटेरा क्रिकेट स्टेडियम आता नरेंद्र मोदी स्टेडियम या नावाने ओळखले जाणार आहे.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3aPdryn

IND vs ENG : नरेंद्र मोदी क्रिकेट स्डेटियमबद्दल आज काय म्हणाला विराट कोहली, पाहा....

अहमदाबाद, : भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना अहमदाबाद येथे सुरु झाला आहे. या स्टेडियमचे अचानक नामांतर करण्यात आले आणि नरेंद्र मोदी क्रिकेट स्डेटियम, असे नाव देण्यात आले. या स्टेडियमबद्दल भारताचा कर्णधार विराट कोहलीने एक वक्तव्य केले आहे. हे स्टेडियम मोठ्या परिसरामध्ये आहे. संपूर्ण परिसराचे नाव सरदार वल्लभभाई पटेल स्पोर्ट्स कॉम्पलेक्स असे करण्यात आले होते. आता भारत आणि इंग्लंड यांच्यातील डे-नाइट कसोटी सामन्याआधी या कॉम्पलेक्समधील क्रिकेट स्टेडियमचे नाव बदलण्यात आले आहे. मोटेरा क्रिकेट स्टेडियम आता नरेंद्र मोदी स्टेडियम या नावाने ओळखले जाणार आहे. विराट या स्टेडियमबद्दल म्हणाला की, " जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमवरचे वातावरण उत्साहवर्धक आहे. पण मला जेवढी भिती सीट्सचे जे रंग आहेत त्यापेक्षा लाईट्सची वाटत आहे. जेव्हा लाईट तुमच्या मागच्या बाजूला असते तेव्हा चेंडू पटकन पाहणे कठीण होऊ शकते. आम्ही अशाच स्टेडियममध्ये खेळलो आहोत. पण या परिस्थितीशी लवकर जुळवून घ्यायला हवे." यापूर्वी प्रेक्षकांच्या क्षमतेचा विचार करता ऑस्ट्रेलियातील मेलबर्न मैदान सर्वात मोठे होते. गुजरात क्रिकेट असोसिएशनद्वारे बांधण्यात आलेले हे जगातील सर्वात मोठे क्रिकेट मैदान आहे. त्याची क्षमता १ लाख इतकी आहे. ६३ एकर परिसरात असलेल्या या मैदानावर ऑलिपिंक साइझचे स्विमिंग पूल आहे. तर चार ड्रेसिंग रूम आहेत. स्टेडियमच्या परिसरात बॉक्सिंग , बॅडमिंटन, टेनिस आणि अन्य कोर्ट आहेत. या परिसरात हॉकी आणि फुटबॉल मैदान देखील आहेत. या मैदानाचे खास वैशिष्ट म्हणजे प्रत्येक ड्रेसिंग रुमला जिम आहे. जे क्रिकेटच्या मैदानावर कधीच पाहायला मिळत नाही. मोटेरा येथील जुने मैदान १९८२ साली बांधण्यात आले होते. आता या नव्या मैदानासाठी ७०० कोटी रुपये खर्च आला. हे मैदान बांधायला जवळपास दोन वर्षे लागली आहेत. त्यामुळे आता या मैदानात कोणते महत्वाचे सामने खेळवण्यात येतात, याकडे सर्वांचे लक्ष असेल.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3bAb1mv

IND vs ENG : जो रुटची विकेट मिळल्यावर विराट कोहलीचे अनोखे सेलिब्रेशन, व्हिडीओ झाला व्हायरल...

अहमदाबाद, : भारताचा कर्णधार विराट कोहलीने एक वेगळाच अवतार या सामन्यात सर्वांना पाहायला मिळाला. कारण इंग्लंडचा कर्णधार जो रुटला बाद केल्यावर कोहलीने अनोखे सेलिब्रेशन केल्याचे पाहायला मिळाले. कोहलीच्या या सेलिब्रेशनचा व्हिडीओ आता चांगलाच व्हायरल झाल्याचे पाहायला मिळत आहे. जो रुट हा इंग्लंडच्या फलंदाजीचा कणा समजला जातो. इंग्लंडने जो पहिला कसोटी सामना जिंकला होता, तेव्हा रुटने द्विशतक झळकावले होते. त्याचबरोबर या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी सर्वात जास्त धावा होतील, असे म्हटले जात होते. त्यामुळे रुट यावेळी किती धावा करतो, याकडे सर्वांचे लक्ष होते. रुटने यावेळी चांगली सुरुवातही केली होती. पण भारताचा फिरकीपटू आर. अश्विनने यावेळी रुटचा काटा काढला. अश्विनने यावेळी रुटला पायचीत पकडले आणि भारतीय संघाने आनंद साजरा करायला सुरुवात केली. त्यावेळी कोहलीने भन्नाट सेलिब्रेशन केल्याचे पाहायला मिळाले. रुटला यावेळी १७ धावांवर समाधान मानावे लागले. रुट लवकर बाद झाल्याचा आनंद यावेळी कोहलीच्या चेहऱ्यावर आणि त्याच्या सेलिब्रेशनमधून दिसत होता. त्यामुळए चाहत्यांना विराटचा व्हिडीओ चांगलाच आवडलेला पाहायला मिळत आहे. गुजरात क्रिकेट असोसिएशनद्वारे बांधण्यात आलेले हे जगातील सर्वात मोठे क्रिकेट मैदान आहे. याआधी प्रेक्षकांच्या क्षमतेचा विचार करता ऑस्ट्रेलियातील मेलबर्न मैदान सर्वात मोठे होते. त्याची क्षमता १ लाख इतकी आहे. ६३ एकर परिसरात असलेल्या या मैदानावर ऑलिपिंक साइझचे स्विमिंग पूल आहे. तर चार ड्रेसिंग रूम आहेत. स्टेडियमच्या परिसरात बॉक्सिंग , बॅडमिंटन, टेनिस आणि अन्य कोर्ट आहेत. या परिसरात हॉकी आणि फुटबॉल मैदान देखील आहेत. या मैदानाचे खास वैशिष्ट म्हणजे प्रत्येक ड्रेसिंग रुमला जिम आहे. जे क्रिकेटच्या मैदानावर कधीच पाहायला मिळत नाही. मोटेरा येथील जुने मैदान १९८२ साली बांधण्यात आले होते. आता या नव्या मैदानासाठी ७०० कोटी रुपये खर्च आला. हे मैदान दोन वर्षात बांधून पूर्ण झाले.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3qRXsFk

IPL : आरसीबीच्या ओपनरची तुफानी खेळी, चौकार आणि षटकारांनीच साकारले शतक

मुंबई : आरसीबीच्या संघातील सलामीवीर सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. कारण एका सामन्यात फक्त चौकार आणि षटकारांचा वर्षाव करत या सलामीवीराने शतक झळकावले आहे. आरसीबीचा युवा सलामीवीर देवदत्त पडीक्कलने विजय हजारे ट्रॉफीमध्ये कर्नाटकच्या संघाकडून खेळताना धडाकेबाज शतक साकारल्याचे पाहाययला मिळाले आहे. हा सामना कर्नाटक आणि उडीसा यांच्यामध्ये झाला. या सामन्यात फलंदाजी करत असताना पडीक्कलने चक्क १४ चौकार आणि पाच षटकार लगावल्याचे पाहायला मिळाले. या सामन्यात पडीक्कलने तुफानी फलंदाजी केली. त्याचबरोबर संघाला यावेळी १४० धावांची सलामीही करुन दिली. पडीक्कलने यावेळी फक्त आपलीच फलंदाजी पाहिली नाही, तर त्याने संघातील फलंदाजांना साथ घेत चांगल्या भागीदाऱ्याही रचल्या. यावेळी पडीक्कलने १४० चेंडूंचा सामान केला. यामध्ये पडीक्कलने १४ चौकार आणि पाच षटकारांच्या मदतीने १५२ धावांची दमदार खेळी साकारली. पडीक्कलच्या या तुफानी खेळीच्या जोरावर कर्नाटकला ५० षटकांमध्ये ३२९ धावांचा डोंगर उभारता आला. गेल्यावर्षी झालेल्या आयपीएमध्ये पडीक्कलला पहिल्यांदा संधी दिली होती. पडीक्कलने या संधीचे सोने केले होते. गेल्या वर्षी झालेल्या आयपीएलमध्ये पडीक्कलने काही महत्वपूर्ण खेळी साकारल्या होत्या. त्याचबरोबर संघाला बऱ्याचदा चांगली सुरुवात करुन दिली होती. त्यामुळेच गेल्या वर्षात पडीक्कलचे नाव चांगलेच चर्चेत राहिले होते. त्यामुळे आता या वर्षीच्या आयपीएलमध्ये पडीक्कलकडून संघाला नक्कीच मोठ्या अपेक्षा असतील.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2NT1Aqe

भारतीय क्रिकेटपटू लढवणार विधानसभा निवडणूक; या पक्षाचा झेंडा घेतला हातात

कोलकाता: पश्चिम बंगालमध्ये लवकरच विधानसभा निवडणुकीची घोषणा होणार आहे. राज्यातील राजकीय वातावरण तापत चालले असताना एका क्रिकेटपटूने राजकारणात उडी घेतली आहे. वाचा- पश्चिम बंगालचा क्रिकेटपटू आणि राज्य संघाचा कर्णधार ( )ने बुधवारी मुख्यमंत्री यांच्या पक्षात प्रवेश केला. भारतीय संघाकडून आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधीत्व केलेल्या मनोजने आता राजकीय मैदानावर खेळण्याचे ठरवले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत त्याला पक्षाकडून विधानसभा निवडणुकीचे तिकीट मिळण्याची शक्यता आहे. मनोजने भारताकडून १५ आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. वाचा- वाचा- मनोजने सोशल मीडियावरून याची घोषणा केली. आजपासून एक नवा प्रवास सुरू करत आहे. तुमचे प्रेम आणि पाठिंब्याची गरज आहे असे मनोजने म्हटले आहे. याच बरोबर त्याने इंस्टाग्रामवर नवे अकाउंट देखील सुरू केले आहे. वाचा- हावडा येथे जन्मलेल्या मनोज तिवारीने २००८ साली भारतीय संघाकडून पदार्पण केले होते. जुलै २०१५ मध्ये त्याने अखेरचा कसोटी सामना खेळला होता. १२ वनडे आणि ३ टी-२० मिळून त्याने २८७ धावा केल्या आहेत. मनोज तिवारीच्या आधी माजी भारतीय क्रिकेटपटू लक्ष्मी रतन शुक्लाने बंगाल निवडणुकीत तृणमूलकडून निवडणूक लढवली होती. शुक्लाने २०१६ साली निवडणूक लढवली होती. तो राज्य सरकारमध्ये क्रीडा मंत्री होता. पाच जानेवारी रोजी त्याने राजीनामा दिला. नॅशनल स्विमिंग चॅम्पियन आणि अभिनेत्री नफीसा अली यांनी देखील २००४ साली लोकसभेची निवडणूक दक्षिण कोलकाता मतदारसंघातून लढवली होती. त्याच बरोबर भारतीय फुटबॉल संघाचे माजी कर्णधार प्रसून बॅनर्जी यांनी २०१३ मधून लोकसभेची पोटनिवडणूक लढवली होती. त्यानंतर २०१४ मध्ये देखील त्यांनी विजय मिळवला होता.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3pPq4Ob

IND vs ENG 3rd Test day 1: भारत विरुद्ध इंग्लंड तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवसाचे Live अपडेट

अहमदाबाद: भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेतील तिसरा कसोटी सामना आजपासून सुरू होणार आहे. अहमदाबाद येथील सामन्याच्या काही मिनिटे आधी या मैदानाचे नाव बदलण्यात आले. आता हे स्टेडियम नरेंद्र मोदी स्टेडियम या नावाने ओळखले जाणार आहे. दोन्ही संघांनी मालिकेत प्रत्येकी एक सामना जिंकला आहे. त्यामुळे या सामन्यात विजय मिळून आघाडी घेण्याचा दोन्ही संघांचा प्रयत्न असेल. Live अपडेट ( 3rd Test day 1)>> भारतीय संघात दोन बदल >> इंग्लंडच्या संघात ४ बदल>> तिसऱ्या कसोटीत इंग्लंडने टॉस जिंकला, प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय असे आहे मोटेरा मैदान


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2P82fVi

IND vs ENG: पंतप्रधानांचे नाव क्रिकेट स्टेडियमला; सामना सुरू होण्याच्या आधी दिले नवे नाव

अहमदाबाद: भारत आणि इंग्लंड यांच्यात अहमदाबाद येथे होणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्याआधी मैदानाचे नाव बदलण्यात आले आहे. हे मैदान म्हणून ओळखले जाते होते. त्यानंतर त्याची पुन्हा बांधणी करण्यात आली आणि सरदार पटेल असे नाव करण्यात आले होते. आता भारत आणि इंग्लंड यांच्यातील डे-नाइट कसोटी सामन्याआधी या स्टेडियमचे नाव पुन्हा एकदा बदलण्यात आले आहे. वाचा- मोटेरा क्रिकेट स्टेडियम आता या नावाने ओळखले जाणार आहे. वाचा- २०१५ साली हे स्टेडियम पूर्णपणे पाडण्यात आले आणि नव्याने त्याची निर्मिती करण्यात आली. या नव्या स्टेडियममध्ये आधुनिक सुविधा निर्माण केल्या. जुन्या मैदानाची प्रेक्षक क्षमता ५३ हजार इतकी होती. आता या मैदानाची क्षमता १ लाख १० हजार इतकी झाली आहे. वाचा- ६३ एकर परिसरात असलेल्या या मैदानावर ऑलिपिंक साइझचे स्विमिंग पूल आहे. तर चार ड्रेसिंग रूम आहेत. स्टेडियमच्या परिसरात बॉक्सिंग , बॅडमिंटन, टेनिस आणि अन्य कोर्ट आहेत. या परिसरात हॉकी आणि फुटबॉल मैदान देखील आहेत. या मैदानाचे खास वैशिष्ट म्हणजे प्रत्येक ड्रेसिंग रुमला जिम आहे. जे क्रिकेटच्या मैदानावर कधीच पाहायला मिळत नाही. मोटेरा येथील जुने मैदान १९८२ साली बांधण्यात आले होते. आता या नव्या मैदानासाठी ७०० कोटी रुपये खर्च आला. हे मैदान दोन वर्षात बांधून पूर्ण झाले. गुजरात क्रिकेट असोसिएशनद्वारे बांधण्यात आलेले हे जगातील सर्वात मोठे क्रिकेट मैदान आहे. याआधी प्रेक्षकांच्या क्षमतेचा विचार करता ऑस्ट्रेलियातील मेलबर्न मैदान सर्वात मोठे होते. त्याची क्षमता १ लाख इतकी आहे.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2P8dKMv

Tuesday, February 23, 2021

भारत विरुद्ध इंग्लंड पिंक बॉल कसोटी; जाणून घ्या हवामान आणि खेळपट्टी, टॉस जिंकल्यावर कोणता निर्णय घ्यावा?

अहमदाबाद: इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना भारतीय संघ आज २४ फेब्रुवारीपासून अहमदाबाद येथील मोटेरा स्टेडियमवर सुरू होणार आहे. नव्याने बांधण्यात आलेल्या या मैदानावर होणारा हा पहिला डे-नाइट म्हणजे गुलाबी चेंडूने होणारा कसोटी सामना असेल. भारत आणि इंग्लंड ( ) यांच्यातील चार सामन्यांची कसोटी मालिका सध्या १-१ अशा बरोबरीत आहे. पहिल्या दोन लढती चेन्नईत झाल्या होत्या. पहिल्या सामन्यात पराभव झाल्यानंतर भारतीय संघाने दुसऱ्या सामन्यात ३१७ धावांनी शानदार विजय मिळवला होता. वाचा- असे आहे पिच पिंक बॉलने खेळल्या जाणाऱ्या या सामन्यात खेळपट्टी महत्त्वाची ठरणार आहे. अशा सामन्यांसाठी क्युरेटर खेळपट्टीवर अतिरिक्त गवत सोडतात. जेणेकरून चेंडूची चमक अधिक वेळ राहिल. मोटेरा मैदानावरील गवत एक दिवस आधी काढण्यात आले आहे. त्यामुळे असे मानले जात आहे की जलद गोलंदाजांना मदत मिळेल. त्याच बरोबर फिरकी गोलंदाजांना देखील टर्न मिळू शकतो. फलंदाजांनी सावधपणे खेळ केला तर ते मोठी धावसंख्या उभी करू शकतील. डे-नाइट टेस्ट असल्यामुळे दव फॅक्टर महत्त्वाचा ठरू शकतो. वाचा- हवामान अहमदाबाद येथे होणारा हा सामना दुपारी २.३० वाजता सुरू होईल. गुजरातमधील वातावरण पाहता उकाडा अधीक असेल. दुपारी ३ वाजता तापमान ३३ ते ३४ डिग्री तर रात्री १० वाजता २७ डिग्री इतके असू शकते. संध्याकाळच्या वेळेत हवामानात बदल होऊ शकतो. दवामुळे दिवसाचे अखेर सत्र महत्त्वाचे ठरू शकते. वाचा- नाणेफेक जिंकल्यास जगातील सर्वात मोठ्या मैदानावर होणाऱ्या या डे-नाइट कसोटीसाठीची खेळपट्टी आणि हवामान पाहता टॉस जिंकल्यास प्रथम फलंदाजी करणे फायद्याची ठरू शकते. टॉस जिंकल्यावर कर्णधार फलंदाजी करण्याचा निर्णय घेईल. जेणे करून सुरुवातीच्या सत्रात फलंदाजी करत धावा करता येतील. वाचा- पाच गोलंदाज भारतीय संघ पाच गोलंदाजांसह या सामन्यात उतरू शकतो. यात उमेश यादवला शार्दुल ठाकूरच्या जागी घेण्यात आले आहे. त्यामुळे त्याचा समावेश अंतिम ११ मध्ये होऊ शकतो. इंग्लंडच्या संघात जेम्स एडरसन आणि जोफ्रा आर्चर यांना घेतले जाऊ शकते.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2PayvqZ

वनडे क्रिकेटमधील अशक्य गोष्ट सचिन तेंडुलकरने करून दाखवली होती; पाहा व्हिडिओ

नवी दिल्ली: जागतिक क्रिकेट, भारतीय क्रिकेट, भारतीय चाहते आणि मास्टर ब्लास्टर () या सर्वांच्यासाठी २४ फेब्रुवारी ही तारीख खास अशी आहे. जागतिक वनडे क्रिकेटच्या इतिहासात ही तारीख तर सुवर्ण अक्षरात लिहली गेली आहे. वनडे क्रिकेटच्या इतिहासात प्रथमच एका फलंदाजाने द्विशतक झळकावले होते. वाचा- आजच्या दिवशी २०१० साली ग्वालियर येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या वनडेत भारताच्या सचिन तेंडुलकरने नाबाद २०० धावा केल्या होत्या. महेंद्र सिंह धोनीच्या नेतृत्वात खेळणाऱ्या भारतीय संघाने या सामन्यात ३ बाद ४०१ धावा केल्या होत्या. त्यानंतर एबी डिव्हिलियर्सच्या नाबाद ११४ धावानंतर देखील आफ्रिकेला २४८ धावांपर्यंत मजल मारता आली होती. या सामन्यात श्रीसंतने सर्वाधिक ३, आशिष नेहरा, रविंद्र जडेजा आणि युसूफ पठाण यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. वाचा- पुरुषांच्या वनडे क्रिकेटमध्ये द्विशतक करण्याचा पहिला मान सचिन तेंडुलकरला मिळाली. सचिनने द्विशतक करताच ग्वालियलमधील प्रेक्षकांनी एकच जल्लोष केला. सचिनने १४७ चेंडूत २५ चौकार आणि ३ षटकारांसह २०० धावा केल्या. त्याचा स्ट्राइक रेट १३६ इतका होता. सचिन शिवाय भारताकडून दिनेश कार्तिकने ८५ चेंडूत ७९ धावा केल्या. तर धोनीने ३५ चेंडूत ७ चौकार आणि ४ षटकारांसह नाबाद ६८ धावा केल्या. वाचा- सामना झाल्यानंतर सचिन म्हणाला, हे द्विशतक मी सर्व भारतीयांना समर्पित करतोय. ज्यांनी गेल्या २० वर्षात माझ्या प्रत्येक चढ-उतारात साथ दिली. या पलिकडे काय बोलायचे मला माहित नाही. मी जेव्हा २०० धावांच्या जवळ पोहोचलो तेव्हा वाटले की द्विशतक करू शकतो. वनडेतील पहिल्या द्विशतकासह सचिनच्या नावावर सर्वाधिक कसोटी सामने (२००) खेळण्याचा विक्रम आहे. त्याने ४६३ वनडे खेळले आहेत. तर एक टी-२० सामाना खेळला आहे. वनडेत सचिनच्या नावावर १८ हजार ४२६ तर कसोटीत १५ हजार ९२१ धावा आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १०० शतक करणारा तो एकमेव फलंदाज आहे.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2NVyzdv

भारताचे दिग्गज फिरकीपटू आणि कर्णधारावर बायपास सर्जरी; जाणून घ्या अपडेट

नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट संघाचे माजी दिग्गज फिरकीपटू ( ) बायपास सर्जरी झाली. त्यांची प्रकृती स्थिर असून लवकरच त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात येणार आहे. भारतीय संघाचे माजी कर्णधार बेदी यांचे वय ७४ असून दोन- तीन दिवसांपूर्वी त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. वाचा- वाचा- बेदी यांचे निकटवर्तीय बेदी यांनी पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की, त्यांच्या प्रकृतीसंदर्भात मला जितकी माहिती आहे. त्यानुसार त्यांना हद्यया संदर्भात काही तक्रारी होत्या. डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर तीन दिवसांपूर्वी बायपास सर्जरी झाली. आता त्यांची प्रकृती ठीक आहे. लवकरच रुग्णालयातून घरी सोडले जाणार आहे. वाचा- भारतीय संघाकडून त्यांनी ६७ कसोटी आणि १० वनडे सामने खेळले होते. कसोटीत २६६ तर वनडेत सात विकेट घेतल्या. गेल्या वर्षी दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट संघाच्या फिरोजशाह कोटला मैदानाचे नाव माजी केंद्रीय मंत्री अरुण जेटली करण्याच्या प्रस्तावाला बेदी यांनी विरोध केला होता. तेव्हा ते चर्चेत आले होते. त्याच बरोबर स्टेडियमच्या एका स्टॅडला देण्यात आलेले नाव काढून टाकण्यास सांगितले होते. तसे न केल्यास कायदेशीर कारवाई करू अशी धमकी त्यांनी डीडीसीएला दिली होती. वाचा- वाचा- टीम इंडियाकडून खेळत असताना बेदी यांनी महत्त्वाच्या विकेट घेतल्या होत्या. १९७६ साली जेव्हा किंगस्टन येथे वेस्ट इंडिजचे गोलंदाज घातक गोलंदाजी करत होते तेव्हा बेदी यांनी टिच्चून फलंदाजी केली होती. वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांनी भारताचे पाच फलंदाज जखमी केले होते. बेदी यांनी खालच्या क्रमांकावर येऊन कसोटी सामना वाचवला होता.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3slIF6d

कर्णधार विराट कोहली विक्रमाच्या उंबरठ्यावर; धोनीला मागे टाकू शकतो आणि...

अहमदाबाद: इंग्लंडविरुद्ध भारतीय संघ डे-नाइट कसोटी सामना खेळणार आहे. टीम इंडिया तिसरी आणि घरच्या मैदानावर दुसरी डे-नाइट टेस्ट खेळणार आहे. ही सामना भारताचा जलद गोलंदाज इशांत शर्मासाठी खास ठरणार आहे. कारण तो त्याचा १००वा कसोटी सामना आहे. या शिवाय भारतीय संघाचा कर्णधार ( )ला एक मोठा विक्रम स्वत:च्या नावावर करण्याची संधी आहे. वाचा- मोटेरा मैदानावर होणाऱ्या डे-नाइट कसोटीत विजय मिळवल्यास तो कर्णधार म्हणून विराटने मिळवलेला २२वा विजय असेल. सध्या भारतात कसोटीत सर्वाधिक २१ विजयाचा विक्रम धोनीच्या नावावर आहे. या सामन्यात विराट कोहलीला धोनीला मागे टाकण्याची संधी आहे. धोनीने भारतातील ३० कसोटी सामन्यात २१ विजय मिळून दिले आहेत. तर विराटने २८ कसोटीत २१ विजय मिळवले आहे. वाचा- चेन्नइत झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात विजय मिळून विराटने धोनीच्या विक्रमाशी बरोबरी केली होती. तिसऱ्या कसोटीत विजय मिळवल्यास विराटला ऑस्ट्रेलियाचा दिग्गज कर्णधार स्टीव्ह वॉच्या विक्रमाशी बरोबरी करण्याची संधी आहे. वॉने घरच्या मैदानावर २२ कसोटी सामने जिंकले आहेत. घरच्या मैदानावर सर्वाधिक कसोटी सामने जिंकण्याचा विक्रम दक्षिण आफ्रिकेच्या ग्रॅमी स्मिथच्या नावावर आहे. त्याने ५३ पैकी ३० कसोटीत विजय मिळवले आहेत. तर रिकी पॉन्टिंग ३९ पैकी २९ विजयासह दुसऱ्या क्रमांकावर आहे. वाचा- वेस्ट इंडिजविरुद्ध २०१९मध्ये दोन सामन्यांची कसोटी मालिका जिंकून विराट धोनीनंतरचा दुसरा यशस्वी कर्णाधार ठरला होता. विराट सध्या कसोटीमधील भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार आहे. त्याने ५८ पैकी ३४ सामन्यात विजय मिळवला आहे. कसोटीत सर्वाधिक विजय मिळवणारे कर्णधार ग्रॅमी स्मिथ- ५३ विजय रिकी पॉन्टिंग- ४८ विजय स्टीव्ह वॉ- ४१ विजय क्लाइव्ह लॉईड- ३६ विजय विराट कोहली- ३४ विजय वाचा- इंग्लंडविरुद्धच्या उर्वरित दोन कसोटीत विजय मिळवल्यास अथवा दोन पैकी एकात विजय आणि एक ड्रॉ केल्यास भारतीय संघ आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पोहोचू शकतो.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2ZFYloL

एका ओव्हरमध्ये ३० धावा दिल्यानंतर फोनवर रडला होता 'हा' भारतीय गोलंदाज

अहमदाबाद: भारत आणि इंग्लंड ( ) यांच्यात उद्यापासून होणारा तिसरा कसोटी सामना टीम इंडियाचा जलद गोलंदाज इशांत शर्मासाठी खास असा ठरणार आहे. इशांतचा हा १००वा कसोटी सामना आहे. त्याने २५ मे २००७ रोजी ढाका येथे बांगलादेशविरुद्ध पहिली कसोटी खेळली होती. त्यानंतर १३ वर्षांनी तो १००वी कसोटी खेळणार आहे. वाचा- गेल्या ३-४ वर्षापासून शानदार फॉर्ममध्ये आहे. इशांतच्या या यशाबद्दल त्याची पत्नी आणि भारतीय बास्केटबॉल संघाची माजी सदस्य प्रतिमा सिंह सांगितले. इशांत कठोर परिश्रम, सातत्य आणि शिस्त यामुळे इतके यश मिळवू शकला. गेल्या १० वर्षात इशांतने कधीच ट्रेनिंग चुकवली नाही. वाचा- इशांतच्या १००व्या कसोटीसाठी आई-वडील यांच्यासह कुटुंबातील १५-१६ जण येणार आहेत. १०० कसोटी सामने ही गोष्टी इशांतसाठी फार मोठी नाही. १०० कसोटी असो वा ३०० विकेट हे रेकॉर्ड त्यासाठी महत्त्वाचे नाहीत, असे प्रतिमा म्हणाली. वाचा- फोनवर रडला होता इशांत इशांत फार गप्पा मारत नाही आणि त्याच्या मनातील गोष्टी पटकन सांगत नाही. २०१३ सालच्या एका घटनेबद्दल प्रतिमाने सांगितले. तेव्हा आमचे लग्न झाले नव्हते. मोहालीत भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामन्यात जेम्स फॉकनरने त्याच्या एका ओव्हरमध्ये ३० धावा केल्या होत्या. त्यानंतर फोनवर तो ढसाढसा रडला होता. क्रिकेटला इतक ही डोक्यावर घेऊ नको. ही एक मोठी गोष्ट आहे पण तो खेळ आहे. जेव्हा तुम्ही असा विचार करता की हा एक खेळ आहे तेव्हा अशा गोष्टीतून बाहेर पडता, असे प्रतिमाने त्याला समजावले होते. वाचा- ...


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3dFr0SL

जो रुटने भारताला ॲडीलेडची आठवण करून दिली; वासीम जाफरच्या उत्तराने बोलती बंद

नवी दिल्ली: भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना उद्या २४ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. नव्याने तयार करण्यात आलेल्या अहमदाबाद येथील मोटेरा मैदानावर होणारी ही लढत डे-नाइट असणार आहे. चार सामन्यांच्या मालिकेत दोन्ही संघ १-१ असे बरोबरीत आहेत. डे-नाइट कसोटीत भारताकडे इंग्लंडपेक्षा कमी अनुभव आहे. टीम इंडियने बांगलादेशविरुद्ध खेळलेल्या पहिल्या डे-नाइट कसोटीत विजय मिळवला होता. त्यानंतर ऑस्ट्रेलियात खेळलेल्या दुसऱ्या लढतीत त्यांचा पराभव झाला होता. वाचा- भारतीय संघाने खेळलेल्या अखरेच्या डे-नाइट कसोटीच्या दुसऱ्या डावात भारताचा ३६ धावांवर ऑल आउट झाला होता. तिसऱ्या कसोटी सामन्याआधी इंग्लंडचा कर्णधार जो रूटने भारतीय संघाला याची आठवण करुन दिली. अर्थात रूटच्या या वक्तव्यावर भारताचा माजी क्रिकेटपटू वासीम जाफरने सडेतोड उत्तर दिले. इएसपीएन क्रिकइन्फोने जो रूटच्या पत्रकार परिषदेतील त्या गोष्टीचा उल्लेख केला आहे ज्यात त्याने भारतीय संघाचा ३६ धावसंख्येवर ऑल आउट झाल्याचे म्हटले होते. भारतीय संघाच्या मनात ही गोष्ट कुठे ना कुठे सुरूच असेल. त्यावर जाफरने उत्तर दिले आहे. वाचा- जाफर म्हणतो, गेल्या वेळी जेव्हा इंग्लंडने डे-नाइट कसोटी खेळली होती तेव्हा त्यांचे ९ विकेट २७ धावांवर पडल्या होत्या. न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या त्या सामन्यात इंग्लंडचा ५८ धावांवर ऑला आउट झाला होता. मी फक्त सांगितले. वाचा- भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिल्या दोन टेस्ट मॅच चेन्नईत झाल्या होत्या. पहिल्या लढतीत इंग्लंडने २२७ ने तर दुसऱ्या लढतीत भारताने ३१७ धावांनी शानदार विजय मिळवत मालिकेत १-१ अशी बरोबरी केली होती. दोन्ही संघांसाठी ही मालिका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. न्यूझीलंड याआधीच फायनलमध्ये पोहोचले आहे. या मालिकेच्या निकालावर भारत, इंग्लंड किंवा ऑस्ट्रेलिया यापैकी एक संघ अंतिम फेरीत पोहोचू शकतो.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2NutmJy

सचिन तेंडुलकर घेणार मोफत क्लास, शिकवणार मास्टर स्ट्रोक कसा लावायचा

मुंबई: भारताचा मास्टर ब्लास्टर फलंदाज () आता युवा खेळाडूंना मोफत मार्गदर्शन करणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक १०० शतक करणाऱ्या सचिन तेंडुलकर त्याचा अनुभव आणि मार्गदर्शन सर्वांना देणार आहे. वाचा- ऑनलाइन शिक्षण देणाऱ्या अनएकेडमीने ही घोषणा केली आहे. सचिनची ऑनलाइन लाइव्ह इंटरेक्टिव्ह पद्धतीने एक सिरीज आयोजित केली जाणार आहे. या माध्यमातून सचिन युवा खेळाडूंना प्रशिक्षण आणि मार्गदर्शन देईल. विशेष म्हणजे सचिनचा हा क्लास प्लॅटफॉर्मवर मोफत असेल. अनएकेडमीने सचिन तेंडुलकरला ब्रॅडअॅबेसिडर म्हणून निवडले आहे. वाचा- मी ऑनलाइन माध्यमातून एक मोफत सत्र करणार आहे. यात सर्वजण सहभागी होऊ शकतात. या सत्रातून माझे विचार शेअर करणार आहे. मी याआधी अनेक मुलांसोबत प्रत्यक्षात चर्चा केली आहे आणि त्यांना मार्गदर्शन केले आहे. पण ऑनलाइन माध्यमातून प्रथमच चर्चा करणार आहे. त्यामुळे ही चर्चा फक्त काही युवा क्रिकेटपटूंपर्यंत नाही तर लाखोंच्या पर्यंत पोहोचेल, असे सचिन म्हणाला. वाचा- प्रत्येकापर्यंत हे मार्गदर्शन पोहोचले पाहिजे आणि त्यांचा प्रश्न माझ्यापर्यंत आला पाहिजे, हा आमचा हेतू असल्याचे सचिनने सांगितले. वाचा- नुकत्याच झालेल्या आयपीएल लिलावात मुंबई इंडियन्सने अर्जुन तेंडुलकरला २० लाख रुपयात खरेदी केले होते. सचिन मुंबई इंडियन्स संघाचा मार्गदर्शक आहे. त्यामुळे प्रथचम अर्जुन वडील सचिनच्या मार्गदर्शनाखाली या वर्षाच्या आयपीएलमध्ये खेळताना दिसणार आहे.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3kgABAX

कराचीत झाली सत्यनारायणाची पूजा; पाक क्रिकेटपटूने शेअर केला व्हिडिओ

: गेल्या वर्षी जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५ ऑगस्ट २०२० रोजी अयोध्येत राम मंदिराच्या निर्मितीसाठी भूमिपूजन केले होते. तेव्हा पाकिस्तानमधील एका क्रिकेटपटूने त्यावर आनंद व्यक्त केला होता. इतक नव्हे तर त्याने अयोध्येत येऊन श्री रामाचे दर्शन घेणार असल्याचे म्हटले होते. आता याच खेळाडूने शेअर केलेला व्हिडिओ चर्चेत आला आहे. वाचा- पाकिस्तानचा माजी फिरकीपटू () सोशल मीडियावर त्याची मते स्पष्टपणे व्यक्त करत असतो. यामुळे तो नेहमी चर्चेत देखील येत असतो. गेल्या वर्षी त्याने पाकिस्तान क्रिकेट बोर्डावर आरोप केले होते. पाकिस्तान बोर्ड कठीण काळात खेळाडूंना पाठिंबा देत नाही, असे तो म्हणाला होता. वाचा- आता कनेरिया पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. त्याने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात तो पत्नी धर्मितासह सत्यनारायणाची पूजा () करताना दिसतोय. कराची झाली पूजा हा व्हिडिओ कनेरियाची पत्नी धर्मिताच्या घरातील आहे. कराचीतील सत्यनारायण स्वामी मंदिरात ही पूजा आयोजित करण्यात आली होती. व्हिडियोत दानिश पूजा पाठ करताना दिसतोय. वाचा- पाकिस्तानकडून ६२ कसोटी खेळणाऱ्या दानिशने २६१ विकेट घेतल्या आहेत. त्याने १८ वनडेत १५ विकेट घेतल्या आहेत. २०१० साली त्याने अखेरची कसोटी खेळली होती. त्याचा जन्म पाकिस्तानमधील कराचीमध्ये झाला असला तरी भारतातील गुजरातशी कौटुंबिक संबंध आहेत. कनेरियाचे कुटुंबीय सुरतमधून पाकिस्तानमध्ये गेले होते.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3aMc2J8

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...