Ads

Tuesday, March 31, 2020

पाक क्रिकेटपटूला पाठिंबा; ट्रोल होत आहेत भारतीय खेळाडू!

नवी दिल्ली: करोना व्हायरसविरुद्धच्या लढ्यात खेळाडूंनी देखील पुढाकार घेतला आहे. फक्त भारतातील नाही तर अन्य देशातील क्रिकेटपटू करोनाग्रस्तांसाठी मदत करत आहेत. पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहीद आफ्रिदी देखील करोना व्हायरसमुळे पीडित असलेल्यांना आणि गरजू लोकांना मदत करत आहे. आफ्रिदीच्या या प्रयत्नांना भारताचा माजी अष्ठपैलू खेळाडू आणि यांनी सोशल मीडियावरून पाठिंबा दिला. पण आता युवी आणि हरभजन यांनी आफ्रिदीचे केलेले हे कौतुक महागात पडत आहे. आफ्रिदीचे कौतुक केल्याबद्दल सोशल मीडियावर या दोघांनाही ट्रोल केले जात आहे. अनेक नेटिझन्सनी या दोघांना तुम्हाला लाज वाटत नाही का असा प्रश्न विचारला आहे. इतक नव्हे तर काहींनी तर युवराज सिंगला ब्लॉक केले आहे आणि त्याचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे. विशेष म्हणजे भारतात #ShameOnYuviBhajji हा हॅशटॅग ट्रेंडिगमध्ये आहे. वाचा- मंगळवारी दुपारी युवराजने एक ट्वीट केले होते. यात त्याने पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू आफ्रिदीचे आणि त्याच्या संस्थेला पाठिंबा दिला होता. या कठीण काळात आपल्याला एकमेकांची मदत करण्याची गरज आहे. शाहीद आफ्रिदी आणि एसएएफ संस्थेला पाठिंबा देतो. कृपया डोनेटकोरोना डॉट कॉमवर लॉगइन करून दान करा. घरी रहा, असे युवराजने म्हटले होते. युवराजच्या या ट्वीटमध्ये हरभजन सिंगला देखील टॅग करण्यात आले होते. युवीच्या आधी हरभजन सिंगने आफ्रीदीचे कौतुक केले होते. काही दिवासांपूर्वी आफ्रीदीने पाकिस्तानमधील गरजू लोकांना साहित्य वाटप केले होते. तेव्हा हरभजनने सोशल मीडियावरून त्याचे कौतुक केले होते. युवराजच्या या ट्विटवरून आता सोशल मीडियावर नेटझन्स भडकले आहेत. अनेक युझर्स युवी आणि हरभजन सिंग यांना ट्रोल करत आहेत. ट्वीट करण्याच्या आधी तुम्ही विचार करायला हवा. आफ्रिदीच्या संस्थेला माझ्याकडून मदत असे म्हणत संबंधित युझरने युवराज सिंगला ब्लॉक केलेला फोटो शेअर केला आहे. अशाच पद्धतीने अनेकांनी या दोन्ही माजी क्रिकेटपटूंना ब्लॉक केले आहे.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2wVIRBY

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...