नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट संघातील सिक्सर किंग अशी ओळख असलेला माजी खेळाडू याने एक मोठा खुलासा केला आहे. युवराज त्याच्या १७ वर्षाच्या करिअरमध्ये अनेक कर्णधारांच्या नेतृत्वाखाली खेळला. यातील कोण होता हे युवराजने सांगितले. त्याच बरोबर त्याने भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीबद्दल देखील एक वक्तव्य केले आहे. वाचा- मला माझ्या करिअरमधील सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखाली खेळलेले दिवस आठवतात. विशेष म्हणजे महेंद्र सिंह धोनीच्या नेतृत्वाखालील भारताने जेव्हा २०११ मध्ये वर्ल्ड कप जिंकला होता. तेव्हा त्या विजयात महत्त्वाचा वाटा युवराज सिंगचा होता. स्पर्धेतील शानदार कामगिरीमुळे युवीला मालिकावीर पुरस्कार देखील मिळाला होता. असे असले तरी त्याला हा सर्वोत्तम कर्णधार वाटतो. एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत युवराजने सांगितले की, सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखालील मी क्रिकेट खेळलो. त्याने मला पाठिंबा आणि प्रोत्साहन दिले. गांगुलीचे कर्णधारपद यासाठी लक्षात राहिले की त्याने मला पाठिंबा दिला. इतका पाठिंबा माही अर्थात अथवा त्यानंतर विराट कोहलीकडून मिळाला नाही. वाचा- भारताकडून युवीने ३०४ वनडेतून ८ हजार ७०१ धावा केल्या. त्याच्या नावावर १४ शतक आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेट करिअरमध्ये श्रीलंकेच्या मुथ्यया मुरलीधरनचा सामना करण्यास सर्वाधिक अडचण व्हायची असे तो म्हणाला. मुरलीधरनची गोलंदाजी समजायची नाही. मग मला सचिन तेंडुलकरने मुरलीच्या चेंडूवर स्वीप कसा खेळायचा याची आयडिया दिली. सचिनच्या आयडीयामुळे मला मदत झाल्याचे युवी म्हणाला. वाचा- ऑस्ट्रेलियाचा दिग्गज गोलंदाज ग्लेन मॅक्ग्राचे बाहेर जाणारे चेंडू नेहमी त्रास द्यायचे. पण मला त्याचा फार सामना करावा लागला नाही. कारण मी कमी कसोटी सामना खेळले, असे युवराजने सांगितले.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2X5V2H0
No comments:
Post a Comment