नवी दिल्ली: करोना व्हायरसविरुद्धची लढाईत सर्वलोक एकत्र आले आहेत. क्रीडा क्षेत्रातील अनेक खेळाडू आणि संघटना आवाहन करण्याबरोबरच आर्थिक मदत देखील करत आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) एका भारतीय पोलीस अधिकाऱ्याचे कौतुक केले आहे. आता तुम्हाला प्रश्न पडेल की करोना विरुद्धच्या लढाईत एका भारतीय पोलीसाचे कौतुक आयसीसीने का करावे. शनिवारी आयसीसीने एक ट्वीट केले. या ट्वीटमध्ये ते म्हणतात, २००७च्या टी-२० वर्ल्ड कपचा हिरो आता २०२०मध्ये जगाचा खरा हिरो ठरला आहे. या ट्वीटसोबत त्यांनी भारताचा माजी क्रिकेटपटू याचा फोटो शेअर केला आहे. जोगिंदरचा २००७ चा वर्ल्ड जिंकल्यानंतरचा आणि आता करोना व्हायरसविरुद्ध पोलीस अधिकारी म्हणून लोकांना घरी जाण्याचे आवाहन करणारा फोटो आयसीसीने पोस्ट केला आहे. चार दिवसांपूर्वी जोगिंदरने एक ट्वीट केले होते. त्यात तो करोना व्हायरसविरुद्ध पुकारलेल्या २१ दिवसांच्या लॉकडाऊन काळात जे लोक घराबाहेर पडले आहेत त्यांना घरी जाण्याचे आवाहन करताना दिसत आहे. क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर जोगिंदर दलात डीएसएपी पदावर काम करत आहे. देशात करोना व्हायरसचे संकट आले असताना जोगिंदर स्वत:चे कर्तव्य बजावत आहे. जोगिंदरने २००७च्या टी-२० वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात अखेरची ओव्हर टाकली होती. भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील या हायव्होल्टेज सामन्यात शर्माने पाकच्या मिस्बाह उल हकला बाद करत भारताला विजय मिळवून दिला होता. भारताला पहिला टी-२० वर्ल्ड कप जिंकून देणारा अशी जोगिंदरची ओळख आहे. क्रिकेट करिअरमध्ये त्याने भारताकडून ४ वनडे, ४ टी-२० सामने खेळले आहेत. क्रिकेटमध्ये जोगिंदरची भरीव कामगिरी नसले तरी २००७च्या विजेतेपदाची चर्चा जेव्हा होते तेव्हा जोगिंदरच्या नावाशिवाय ती संपत नाही. करोना संकटामुळे जगभरातील सर्व क्रीडा स्पर्धा स्थगित करण्यात आल्या आहेत. आयसीसीसह जगभरातील अन्य क्रिकेट बोर्डांनी देखील द्विपक्षीय मालिका रद्द केल्या आहेत. भारतातील आयपीएल स्पर्धा देखील १५ एप्रिलपर्यंत स्थगित केली आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2UCK0Go
No comments:
Post a Comment