नवी दिल्ली: क्रिकेटमध्ये अनेक वेळा एखाद्या खेळाडूच्या दुखापतीमुळे त्याला बदली म्हणून दुसऱ्याला संधी मिळते आणि बदली खेळाडू इतिहास घडवतो. अशीच घटना २७ मार्च १९९४ रोजी झाली होती. या निर्णयामुळे फक्त भारतीय क्रिकेटमध्ये नव्हे तर जागतिक क्रिकेट विश्वात नव्या पर्वाला सुरूवात झाली. वाचा- भारतीय संघ न्यूझीलंड दौऱ्यावर होता. ऑकलंड मैदानावर दोन्ही संघादरम्यान वनडे सामना होणार होता. या सामन्याआधी भारताचा कर्णधार मोहम्मद अझरूद्दीन अडचणीत सापडला. कारण भारताचा नियमीत सलामीवीर नवज्योत सिंग सिद्धू सामना सुरू होण्याआधी अनफिट होता. आता त्याच्या जागी सलामीवीर म्हणून कोणाला पाठवायचे असा प्रश्न कर्णधार आणि संघ व्यवस्थापनापुढे होता. अशा वेळी सर्वांची नजर गेली २० वर्षाच्या सचिन तेंडुलकरवर. सचिनने गेल्या साडे चार वर्षाच्या काळात स्वत:ला सिद्ध केले होते. तरुण आणि आक्रमक असलेल्या सचिनला अझरने सलामीवीर म्हणून पाठवण्याचा निर्णय घेतला. वाचा- या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या न्यूझीलंडचा डाव भारताने फक्त १४९ धावांवर संपुष्ठात आणला. भारतासमोर मोठे लक्ष्य नव्हते. अझरने सचिनवर विश्वास ठेवला आणि सलामीला पाठवले. अझरच्या एका निर्णयाने भारतीय क्रिकेटची दिशाच बदलली आणि सचिनला त्याच्या हक्काची जागा देखील मिळाली. वाचा- सचिनने डावाची सुरूवात धमाकेदार केली. जवळ जवळ प्रत्येक चेंडू सीमेच्या पलिकडे जाऊ लागला. सचिनच्या आक्रमक खेळीने न्यूझीलंडचे गोलंदाज देखील हैराण झाले. या सामन्यात सचिनने ४९ चेंडूत ८२ धावा केल्या. यात १५ चौकार आणि दोन षटकारांचा समावेश होता. भारताने हा सामना २३.२ षटकात ३ विकेटच्या बदल्यात जिंकला. सलामीवीर म्हणून प्रथम फलंदाजीला आलेल्या सचिनचा व्हिडिओ या सामन्यात सचिनचे शतक हुकले आणि क्रिकेटमधील एका नव्या पर्वाची सुरूवात झाली ज्यात अनेक विक्रम रचले जाणार होते. सचिनने करिअरमध्ये भारताकडून ३४४ सामन्यात सलामीवीर म्हणून फलंदाजी केली आणि १५ हजार ३१० धावा केल्या. त्याची सरासरी ४८.२९ इतकी होती. वनडेत सचिनच्या नावावर ४९ शतक आहेत त्यातील ४५ शतके सलामीवीर म्हणून फलंदाजी करताना केली आहेत. सचिनने जर सलामीवीर म्हणून फलंदाजी केली नसती तर त्याची सरासरी देखील कमी असती. त्याने ११९ सामन्यात खालच्या क्रमांकावर फलंदाजी केली आहे. यात सचिनने ३३च्या सरासरीने ३१६ धावा केल्या आहेत.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3bqZIeL
No comments:
Post a Comment