भारताचा माजी महान फलंदाज सचिन तेंडुलकरने आजच्याच दिवशी एक विक्रम रचला होता. या सामन्यात भारताने विजयही मिळवला होता. सचिनला विक्रमादित्य असे म्हटले जाते. कारण क्रिकेट विश्वात सर्वाधिक विक्रम सचिनच्या नावावर आहेत. त्याचे काही विक्रम अजूनही अबाधित आहेत. ही गोष्ट घडली होती २००१ साली. भारताचा समोर उभा ठाकला होता ऑस्ट्रेलियाचा तगडा संघ. पण ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांचा सचिनने खरपूस समाचार घेत हा विक्रम केला होता. इंदूर येथे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये तिसरा एकदिवसीय सामना झाला होता. या सामन्यात सचिन आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांनी १९९ धावांची भागीदारी रचली होती. या सामन्यात सचिनने शतक झळकावले होते. हे शतक २५९ डावांत आले होते. या शतकासह सचिनने एकदिवसीय क्रिकेटमध्ये १० हजार धावांचा पल्ला गाठला होता. या सामन्यात भारताने २९८ धावा केल्या होत्या. भारताच्या अजित आगरकर आणि हरभजन सिंग यांनी प्रत्येकी तीन विकेट्स घेतल्यामुळे ऑस्ट्रेलियाचा डाव १८८ धावांत संपुष्टात आला होता आणि भारताने ११८ धावांनी दमदार विजय मिळवला होता. सचिनने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत ३४, ३५७ धावा केल्या आहेत. यामध्ये १०० शतकांचा समावेश आहे. १०० पैकी सचिनने ५१ शतके एकदिवसीय आणि ४९ शतके कसोटी क्रिकेटमध्ये केली आहेत. सचिनने एकदिवसीय क्रिकेटमध्ये १८, ४२६ धावा केल्या आहेत, त्याचबरोबर कसोटी क्रिकेटमध्ये सचिनने १५, ९२१. सचिन आपल्या कारकिर्दीत फक्त एकमेव आंतरराष्ट्रीय ट्वेन्टी-२० सामना खेळला. या एकमेव ट्वेन्टी-२० सामन्यात सचिनने १० धावा केल्या होत्या. सचिन हा सुरुवातीला सलामीला येत नव्हता. जवळपास साडे चार वर्षांनी सचिनला पहिल्यांदा न्यूझीलंडमध्ये सलामी करण्याची संधी मिळली. सचिनने डावाची सुरूवात धमाकेदार केली. जवळ जवळ प्रत्येक चेंडू सीमेच्या पलिकडे जाऊ लागला. सचिनच्या आक्रमक खेळीने न्यूझीलंडचे गोलंदाज देखील हैराण झाले. या सामन्यात सचिनने ४९ चेंडूत ८२ धावा केल्या. यात १५ चौकार आणि दोन षटकारांचा समावेश होता. भारताने हा सामना २३.२ षटकात ३ विकेटच्या बदल्यात जिंकला.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3aA4VAI
No comments:
Post a Comment