Ads

Saturday, March 28, 2020

करोना दोन वर्षांपूर्वीच आला होता, हरभजनचा खुलासा

सध्याच्या घडीला करोना व्हायरसने जभरात थैमान घातले आहे. पण हा करोना व्हायरस दोन वर्षांपूर्वीच आला होता, असा खुलासा भारताचा फिरकीपटू हरभजन सिंगने केला आहे. हरभजनने एक ट्विट केले आहे. या ट्विटनुसार हा करोना व्हायरस दोन वर्षांपूर्वीच आला होता. दोन वर्षांपूर्वीच मी या करोना व्हायरसबद्दल ऐकले होते, असा खुलासा हरभजनने केला आहे.हरभजनने केलेला खुलासा धक्कादायक आहे. करोना व्हायरस हा चीनमधून आल्याचे आपणा सर्वांनाच माहिती आहे. पण जागतिक आरोग्य संघटनेने करोना व्हायरस हा कोणत्या देशात किंवा धर्मात तयार होतो, या गोष्टीचे खंडन केले आहे. त्याचबरोबर करोना व्हायरस हा प्रयोगशाळेत तयार होऊ शकत नाही, असेही काही डॉक्टरांनी सांगितले आहे. पण या करोना व्हायरसची कुणकुण दोन वर्षांपूर्वीच लागली होती, असे हरभजनने सांगितले आहे. हरभजनच्या वक्तव्यावर काही जणांनी आक्षेप घेतला आहे, तर काही जणांनी त्याची खिल्ली उडवली आहे. काही जण हरभजनला ट्रोलही करताना दिसत आहेत. पण हरभजन म्हणतोय ते काही चुकीचे नाही. कारण याबाबतचा व्हिडीओच हरभजनने आपल्या ट्विटरवर पोस्ट केला आहे. हरभजनने पोस्ट केलेला व्हिडीओ हा २०१८ साली आलेल्या एका कोरिअन सिरीजचा आहे. या सीरिजचे नाव होते 'माई सीक्रेट टेरियस'. या सीरिजमध्ये करोना व्हायरसबद्दल भविष्यवाणी केली हहोती. हा व्हिडीओ सध्याच्या घडील सोशल मीडियावर चांगलाच वायरल होत आहे. या व्हिडीओचा मुख्य भाग हरभजनने आपल्या ट्विटरवर पोस्ट केला आहे. या ट्विटमध्ये हरभजनने लिहिले आहे की, " या सर्व गोष्टी वेडेपणाच्या आहेत. जर तुम्ही घरी आहात, तर तुम्ही नेटफ्लिक्सवर जा आणि 'मॉय सेक्रेट टेरेस'च्या पहिल्या सीझनचा दहावा एपिसोड पाहा. या दहाव्या एपिसोडच्या ५३व्या मिनिटाला तुम्हाला करोनाबाबतचे संवाद पाहायला मिळतील. ही सीरीज २०१८ मध्ये आली होती आणि करोना आता २०२० साली आला आहे. हे सारे डर पूर्वनियोजत असेल तर ते नक्कीच धक्कादायक आहे."


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2UKpovV

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...