नवी दिल्ली: करोना व्हायरसमुळे देशात २१ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. पंतप्रधान मोदी यांनी १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन असल्याचे सांगितले आहे. देशातील बहुतांश जनता घरीच थांबली आहे. पण काही जण मात्र लॉकडाऊनचे पालन करत नाहीत. अशा लोकांना भारताचा माजी क्रिकेटपटू हरभजन सिंगने फटकारले. वाचा- करोना व्हायरसची लागण रोखण्यासाठी पुढील काही दिवस अतिशय महत्त्वाचे आहे. त्यामुळेच लॉकडाऊन यशस्वी होणे आवश्यक आहे. यासंदर्भात देशाच्या पंतप्रधानांपासून ते सिनेस्टार आणि खेळाडू वारंवार आवाहन करत असताना देखील काही जण रस्त्यावरून फिरत आहे. अशा लोकांवर पोलिस कारवाई करत आहे. वाचा- हरभजनने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत काही लोक रस्त्यावर फिरताना दिसत आहेत. जेव्हा या लोकांना पोलिस रोखतात आणि घरी जाण्याचा सल्ला देतात तेव्हा ते पोलिसांसोबत वाद घालतात. यावर हरभजन म्हणतो, पोलिसांच्या बद्दलची आपला व्यवहार बदलण्याची गरज आहे. आपल्या सुरक्षेसाठी ते स्वत: चे आयुष्यपणाला लावून दिवस रात्र रस्त्यावर फिरत आहे. या व्हिडिओत, पोलिसांना काही जण मिळून मारहाण करताना दिसत आहेत. या घटनेवर हरभजन चांगलाच भडकला आहे. करोना व्हायरसने आतापर्यंत २१ हजार जणांचा मृत्यू झाला आहे. या व्हायरसची लागण झालेल्यांची संख्या ४ लाखांवर पोहोचली आहे. भारतात देखील करोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. त्यामुळेच केंद्र सरकारने २१ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला. जे लोक लॉकडाऊन न पाळता घरातून बाहेर येत आहेत. त्यांच्यावर पोलिस कारवाई करत आहेत. केंद्रीय आरोग्य कल्याण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार देशात आतापर्यंत करोना व्हायरसमुळे १७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर करोनाची लागण झालेल्यांची संख्या ७००वर पोहोचली आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2WOrYnh
No comments:
Post a Comment