नवी दिल्ली: चीनमधून जगभरात पसरलेल्या करोना व्हायरसविरुद्धच्या लढाईत सर्व जण स्वत:चे योगदान देत आहेत. अनेक जण केंद्र आणि राज्य सरकारांना आर्थिक मदत करत आहे. यात खेळाडूंचा देखील समावेश आहे. या दरम्यान भारताचा माजी क्रिकेटपटू याने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. करोना व्हायरसशी लढाई लढत असताना हा फोटो आपल्या सर्वांना प्रेरणा देणारा आहे. वाचा- लक्ष्मणने नाशिकमधील एका शेतकऱ्याचा फोटो शेअर केला आहे. दत्ता राम पाटील असे या शेतकऱ्याचे नाव आहे. दत्ता पाटील यांनी त्यांच्या ३ एकर शेतापैकी १ एकरातील धान्य गरजू लोकांना दान देण्याचा निर्णय घेतला. लक्ष्मणने इस्टाग्रामवर ही माहिती शेअर केली आहे. वाचा- दत्ता पाटील यांच्या मते मी आर्थिकदृष्ट्या कोणाला मदत करू शकत नाही. पण या संकटच्या वेळी एक चपाती खाल्ली आणि गरजू व्यक्तीला अर्धी देऊ शकतो, असे लक्ष्मणने फोटो शेअर करताना म्हटले आहे. लक्ष्मणने दत्ता पाटील यांच्या सारख्या निस्वार्थ लोकांना सलाम केला आहे. करोना व्हायरसपासून बचावासाठी केंद्र सरकारने २१ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे. अनेकांना घरी थांबावे लागत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी करोनाविरुद्धच्या लढाईत सर्वांना घरी राहण्याचे आणि दान करण्याचे आवाहन केले आहे. या व्हायरसमुळे जगभरात ३१ हजार लोकांचा मृत्यू झाला असून भारतात एक हजारहून अधिक रूग्ण आढळले आहेत. भारतातील मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या २९ वर पोहोचली आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3bCAs5m
No comments:
Post a Comment