नवी दिल्ली: करोना व्हायरसच्या विरुद्ध सुरू असलेल्या लढाईत प्रत्येक व्यक्ती मदत करत आहे. भारतीय क्रिकेट संघातील आजी माजी खेळाडू केंद्र आणि राज्य सरकारांना आर्थिक मदत करत आहेत. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, कर्णधार विराट कोहली यांच्यानंतर आता हिटमॅन याने करोना लढाईत मदत जाहीर केली आहे. वाचा- भारतीय संघाचा उपकर्णधार रोहितने करोना व्हायरसविरुद्धच्या लढाईत ८० लाख रुपये देण्याचे ठरवले आहे. या संदर्भातील माहिती रोहितने ट्वीट करून दिली. आपल्या देशाला स्वत:च्या पायावर उभे राहिलेले आपणाला पाहायचे असते आणि त्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. मी देखील माझ्याकडून याासाठी योगदान देण्याचे ठरवले आहे. मी मुख्यमंत्री मदत निधीसाठी ४५ लाख आणि पंतप्रधान मदत निधीसाठी २५ लाख रुपये देणार आहे. तर पाच लाख रुपये फंडिंग इंडिया आणि ५ लाख रुपये वेलफेअर ऑफ स्ट्रे डॉग्स यांच्यासाठी देणार असल्याचे रोहितने म्हटले आहे. वाचा- याआधी भारताचा कर्णधार विराट कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा यांनी सोमवारी ट्वीटकरून मदत करत असल्याचे जाहीर केले होते. पण त्या दोघांनी किती रक्कम दिली याचा मात्र खुलासा केला नाही. वाचा- भारतीय क्रिकेटपटूंमध्ये सौरव गांगुली, सचिन तेंडुलकर यांनी प्रत्येकी ५० लाख रुपयांची मदत दिली आहे. तर ऑलिम्पिक पदक विजेती बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने १० लाख रुपये दिले आहेत. भारताचा मधळ्या फळीतील फलंदाज सुरेश रैनाने ५२ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. हे देखील वाचा-
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2JsPfDC
No comments:
Post a Comment