करोना व्हायरसचा फटका संपूर्ण जगाला बसलेला आहे. क्रीडा क्षेत्रालाही करोना व्हायरसने त्रस्त केले आहे. त्यामुळे सध्याच्या घडीला जवळपास सर्वच खेळाडू आपल्या घरी आहेत. पण घर बसल्याही ऑस्ट्रेलियाचा कर्णधार आरोन फिंचला एक गोष्ट सतावते आहे. ती गोष्ट आहे भारताचा स्विंग गोलंदाज भुवनेश्वर कुमारचा एक चेंडू. या एका चेंडूमुळे फिंच चांगलाच त्रस्त झालेला पाहायला मिळतो आहे. सध्या फिंचही करोना व्हायरसमुळे आपल्या घरीच आहे. पण तरीही त्याला भूतकाळातला एक चेंडू सतावतो आहे. फिंचला एका चाहत्याने ट्विटरवर भुवनेश्वरच्या एका चेंडूबाबत प्रश्न विचारला होता. या प्रश्नाचे उत्तर देताना फिंच चांगलाच दडपणाखाली आला होता. कारण हा भुवनेश्वरचा चेंडू तो आयुष्यात कधीही विसरू शकत नाही. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील एका सामन्यादरम्यान ही गोष्ट घडली होती. ऑस्ट्रेलियाच्या संघाची फलंदाजी होती आणि फिंच भुवनेश्वरच्या गोलंदाजीचा सामना करत होता. त्यावेळी भुवनेश्वरने आपल्या षटकातील अखेरचा चेंडू पंचांच्या जवळून टाकला. हा चेंडू पाहून फिंचला काय करावे हे समजत नव्हते. त्यामुळे फिंचने हा चेंडू सोडून दिला होता. पण त्यानंतरच्या चेंडूवर मात्र फिंच चांगलाच चक्रावलेला पाहायला मिळाला. भुवनेश्वरने जेव्हा पंचांच्या जागेवरून चेंडू टाकला. त्याबाबत फिंचला विचारल्यावर तो म्हणाला की, " भुवनेश्वरचा हा चेंडू पाहून मी चांगलाच चक्रावलो होतो. या चेंडूवर नेमका कोणता फटका मारायचा याचा विचार मी करत राहिलो. या चेंडूवर मला चफटका मारता आला नाही. पण त्यानंतरच्या चेंडूवरच मी बाद झालो." भुवनेश्वरचा हा चेंडू डेड बॉल ठरवण्यात आला होता. पण त्यानंतर भुवनेश्वरने असा काही चेंडू टाकला की फिंचला बाद होऊन तंबूत तपरतावे लागले होते. भुवनेश्वरने यावेळी फिंचला पायचीत पकडले आणि जोरदार अपील केली होती. पंचांनीही यावेळी फिंचला बाद दिले आणि त्यानंतर भारताचा कर्णधार विराटकोहलीसह सर्वांनीच जल्लोष केला होता. यापूर्वी ऑस्ट्रेलियाचा महान फिरकीपटू शेन वॉर्नच्या स्वप्नात भारताचा माजी महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आला होता. फिंच्या स्वप्नात भुवनेश्वर आला नसला तरी तो हा चेंडू अजूनही विसरू शकलेला नाही.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2QPMctl
No comments:
Post a Comment