नवी दिल्ली: करोना व्हायरसविरुद्ध संपूर्ण जग लढत आहे. जगावर आलेल्या या संकटाचा मुकाबला करण्यासाठी अनेक जण आर्थिक स्वरुपात मदत करत आहेत. भारतासह अनेक देशांनी करोना वाढू नये म्हणून लॉकडाऊन केले आहे. या काळात सर्वाधिक हाल होत आहेत ते गरीब कुटुंबांचे... त्यांना मदत करण्यासाठी अनेक संस्था आणि खेळाडू मदतीला येत आहे. वाचा- भारतातील अनेक क्रिकेटपटूंनी केंद्र आणि राज्य सरकारला आर्थिक मदत केली आहे. काही जण गरीब कुटुंबांना अन्न-धान्य देत आहेत. करोनाविरुद्ध लढण्यात ज्यांचा रोजगार केला आहे. अशा २ हजार कुटुंबांना एक क्रिकेटपटू अन्न-धान्य देत आहे. वाचा- बांगलादेशचा अष्ठपैलू क्रिकेटपटू याने त्याच्या संस्थेमार्फत दोन हजार लोकांच्या रोजच्या जेवणाची सोय केली आहे. शाकिबने ही माहिती फेसबुक पेजवरून दिली आहे. करोना व्हायरसमुळे जे लोक पीडित झाले आहेत. अशा बांगलादेशमधील दोन हजार लोकांच्या जेवणाची सोय माझी संस्था करत आहे, असे शाकिबने म्हटले आहे. वाचा- शाकिबवर सध्या आयसीसीने बंदी घातली आहे. बुकिजची माहिती न दिल्याबद्दल ही कारवाई करण्यात आली होती. तो २९ ऑक्टोबर २०२० पर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळू शकणार नाही. त्याने बांगलादेशकडून ५६ कसोटीत ५ शतकांसह ३ हजार ८६२ धावा, तर २०६ वनडेत ३७.८६ च्या सरासरीने ६ हजार ३२३ धावा केल्या आहेत. टी-२० शाकिबने ७६ सामन्यात १ हजार ५६७ धावा केल्या आहेत. शाकिबच्या आधी बांगलादेश क्रिकेट संघातील खेळाडूंनी त्यांचे अर्धे वेतन करोनाग्रस्तांसाठी दिले होते. अन्य देशांच्या तुलनेत बांगलादेशमध्ये करोना रुग्णांची संख्या कमी आहे. आतापर्यंत देशात ४८ लोकांना करोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3dERBwX
No comments:
Post a Comment