नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील कोणतीही लढत ही हायव्हेल्टेज असते. या दोन्ही देशात द्विपक्षीय मालिका सध्या बंद असल्यातरी आयसीसीच्या स्पर्धेत हे दोन्ही संघ खेळतात. सध्या करोना व्हायरसमुळे सर्वच सामने रद्द करण्यात आले आहे. आजच्या दिवशी २०११ मध्ये भारताने पाकिस्तानचा वर्ल्ड स्पर्धेत पराभव केला होता. आजच्या दिवशी २०११च्या वर्ल्ड कप स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात उपांत्य फेरीतील लढत झाली होती. भारताने उपांत्य पूर्व फेरीत ऑस्ट्रेलियाचा पराभव केला होता. या सामन्यात सर्वांची नजर सचिन तेंडुलकरवर होती. कारण सचिनच्या नावावर ९९ आंतरराष्ट्रीय शतकांची नोंद झाली होती. पाकिस्तानविरुद्ध सचिन १००वे शतक पूर्ण करेल असे सर्वांना वाटत होते. विशेष म्हणजे मोहालीत झालेल्या या सामन्यात पाकिस्तानने सचिनचे एक नव्हे तर चार कॅच सोडले. पण सचिन या सामन्यात १०० धावा करू शकला नाही. तो ८५ धावांवर बाद झाला भारताने या सामन्यात २६० धावा केल्या. वाचा- पाकिस्तानसाठी हे लक्ष्य फार मोठे नव्हते. कामरान अकमल आणि मोहम्मद हफीज यांनी पाकला चांगली सुरूवात करून दिली. तेव्हा भारतीय गोलंदाजी कमकूवत असल्याचे वाटत होते. तरी त्यांनी शानदार कामगिरी केली. भारताकडून झहीर खान, आशीष नेहरा, मुनाफ पटेल, हरभजन सिंग, युवराज सिंग यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या होत्या. वाचा- पाकिस्तानने सातत्याने विकेट विकेट गमावल्या आणि भारताने हा सामना २९ धावांनी जिंकला. या विजयासह भारताने वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानविरुद्ध विजय परंपरा कामय राखली होती.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3dGaAao
No comments:
Post a Comment