नवी दिल्ली: करोना व्हायरसमुळे जगभरातील १५०हून अधिक देशात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रत्येक देशातील सरकार आणि जागतिक आरोग्य संघटना करोना रोखण्यासाठी प्रयत्न करत आहेत. यामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या १६ हजारावर केली आहे. क्रीडा क्षेत्रावर देखील याचा परिणाम झाला आहे. वाचा- भारताचा शेजारी असलेल्या श्रीलंकेत देखील करोनाचे १०० हून अधिक रुग्ण आढळले आहेत. श्रीलंका लहान देश असला तरी येथील लोकसंख्या दाट आहे. देशातील करोनाविरुद्धच्या लढ्यासाठी येथील क्रिकेट बोर्डाने पुढाकार घेतला आहे. वाचा- श्रीलंकेच्या क्रिकेट बोर्डाने २५ मिलियन श्रीलंका रुपये भारतीय चलनात विचार केल्यास १ कोटी रुपये सरकारला दिले आहेत. बोर्डाने सोशल मीडियावरून ही माहिती दिली. श्रीलंका क्रिकेटने करोनाविरुद्ध लढण्यासाठी सरकारला LKR २५ मिलियनची मदत करण्याचा निर्णय घेतला असल्याचे म्हटले आहे. ही रक्कम बोर्डाकडून थेट सरकारला दिला जाणार आहे. ही रक्कम सरकार आरोग्य आणि करोना व्हायरसने बाधित झालेल्या रुग्णांसाठी वापरेल. दिलासा देणारीबाब म्हणजे श्रीलंकेत अद्याप एकाचाही मृत्यू झालेला नाही.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2UutxEs
No comments:
Post a Comment